Name Starts With R Personality : ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या नावातील पहिले अक्षर खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण – पहिले अक्षर व्यक्तीचे व्यक्तिमत्व, करिअर, प्रेम जीवनाबद्दल माहिती देते. तर तुमचे नाव ‘R’ अक्षराने सुरू होत असेल तर तुमच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. कारण – तुमची रास तूळ असते. तुम्ही खूप प्रभावशाली, नेहमी हसतमुख आणि तुमचे मन निर्मळ असते. गरज पडल्यास इतरांसाठी लढायलाही तयार असतात. चला तर आज ‘R’ नावाच्या लोकांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

ज्या लोकांचे नाव ‘R’ अक्षराने सुरू होतात, त्यांचे व्यक्तिमत्व सामान्यतः आकर्षक मानले जाते. तुमच्या शब्दांत आणि वागणुकीत लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असते. असे लोक आत्मसन्मानाला खूप महत्त्व देतात, कोणतेही कार्य पूर्ण समर्पणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्यात उत्तम नेतृत्व कौशल्ये देखील असतात. स्वतःच्या मतांवर ठाम राहता, ज्यामुळे तुम्हाला लोक हट्टी समजतात. पण, हाच गुण तुम्हाला ध्येये साध्य करण्यास मदत करतो. जरी बाहेरून शांत दिसत असलात तरीही तुमच्या मनात नेहमीच कल्पना फिरत असतात, ज्यामुळे तुम्हाला सखोल विचार आणि नियोजन करता येतात.

तुम्ही खूप उत्साही असतात. कामाप्रती अत्यधिक समर्पणामुळे तणाव, थकवा, झोपेचा अभाव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी योग आणि ध्यान फायदेशीर मानले जातात. तम्च्यात उत्तम निर्णयक्षमता आणि नेतृत्व कौशल्ये असल्याचे मानले जाते. यामुळेच प्रशासन, व्यवस्थापन, विपणन, माध्यम, शिक्षण, राजकारण, बँकिंग आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकता.

नवीन कल्पनांवर काम करायला आवडते आणि आपल्या कठोर परिश्रमातून प्रगती करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना हळूहळू पण चांगले यश मिळण्याची अपेक्षा असते. हे लोक बाहेरून शांत दिसतात. पण, तुमच्या मनात नेहमीच मोठ्या कल्पना सुरूच असतात आणि त्यावर तुम्ही खूप विचार आणि नियोजन करता. व्यवसायात जोखीम घेता, नवीन योजना, संधी ओळखण्यात निपुण मानले जाता. जर तुम्ही योग्य रणनीती आणि संयमाने काम केले, तर ते व्यवसायात चांगली प्रगती करू शकतात. मात्र, कोणतीही गुंतवणूक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घेणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

पण, प्रियजनांप्रति समर्पित असतात आणि विश्वासाला खूप महत्त्व देतात. एकदा का तुमच्यावर कोणावर विश्वास बसला की, तुम्ही त्यांच्याबरोबर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मात्र, कधीकधी या स्वभावामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे थोडे सावध राहा.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)