Daily Horoscope 27 August 2026 In Marathi : आज २७ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी सकाळी ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज धनिष्ठा नक्षत्र जागृत होईल आणि शोभन योग जुळून येणार आहे. राहू काळ १ वाजून ५९ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वजवून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आवाज अभिजात मुहूर्त ११ वाजून ४७ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज नारळी पौर्णिमा असणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा जाणार चला जाणून घेऊ.
आजचे पंचांग व राशिभविष्य, २७ ऑगस्ट २०२६ (Horoscope Today 27 August 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
आज आपल्या सौंदर्याचे कौतुक होईल. जुनी भांडणे मिटतील. धडाडीवर संयम ठेवा. भौतिक सुखाचा आनंद घेता येईल. व्यापारात काही सुधारणा कराव्या लागतील.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
मानसिक संतुलन हरवू देऊ नका. पायाच्या दुखण्याकडे लक्ष द्या. काही किरकोळ समस्यांतून मार्ग निघेल. कार्यालयीन सदस्यांशी वादाची शक्यता. मित्रांशी चर्चेतून मार्ग निघेल.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
व्यक्तिमत्वाची छाप पडण्यात यशस्वी व्हाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. संयमाने व धीराने निर्णय घ्यावा लागेल. मित्रांशी सुसंवाद साधता येईल. वाहनाचे काम निघेल.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
नोकरी व व्यवसायात मोठी संधी चालून येईल. तुमच्या बाबतीत संशय निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. दिनक्रम व्यस्त राहील. मन विचलीत होऊ शकते. भौतिक सुखाची अनुभूति घ्याल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
नवीन प्रयोगाला यश मिळेल. मित्रांचा सल्ला ग्राह्य मानाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. गोड बोलून कामे साध्य कराल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
कष्टाने मान मिळवाल. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होईल. तुमचा प्रभाव वाढेल. व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. काही खर्च अचानक उद्भवतील.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
बौद्धिक गुण वापरून कामे करावीत. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. आजचा दिवस शुभ राहील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
विचारपूर्वक सल्ला द्या. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जुनी येणी असतील तर त्याचा पाठपुरावा करा. ऐनवेळी येणार्या समस्या सोडवता येतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
धार्मिक गोष्टीत स्वत:ला रमवाल. जोडीदाराकडून चांगला लाभ होईल. कार्य सिद्धीस साशंकता नको. आध्यात्मिक कामात रुचि वाढेल. मनापासून जबाबदार्या पार पाडाल.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
मानसिक आरोग्य टिकवाल. नातेवाईकांशी चांगले धोरण ठेवाल. निर्णय क्षमतेत वाढ होईल. कौटुंबिक मतभेद दूर होतील. चिकाटी सोडून चालणार नाही.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
स्वत:बद्दलचा आत्मविश्वास भक्कम करा. आज प्रवास नको. सौम्य शब्दात आपले मत मांडा. जोडीदाराची प्रगती सुखावणारी असेल. व्यवहारी दृष्टिकोन बाळगावा.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
अकारण खर्चाची शक्यता. मुलांवरील खर्च वाढू शकतो. उगाचच मन खिन्न होण्याची शक्यता. भागीदारीच्या व्यवसायात विश्वास महत्त्वाचा ठरेल. नोकरदार वर्गाच्या समस्या दूर होतील.
