Weekly Horoscope 2 To 8 March 2026: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्रहस्थितीत मोठे बदल होत असून त्याचा थेट परिणाम 12 राशींच्या व्यक्तींवर दिसू शकतो. शुक्र 2 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करून शनिसोबत युती करीत आहेत. कुंभ राशीत मंगळ, बुध, सूर्य आणि राहू एकत्र विराजमान असल्याने चतुर्ग्रही योगासह बुधादित्य आणि मंगळादित्य राजयोगाची निर्मिती होत आहे. मिथुन राशीत गुरु बृहस्पति, तर सिंह राशीत केतू स्थित आहेत.
या आठवड्यात चंद्रमा सिंह, कन्या आणि तुला राशीत भ्रमण करणार असून होलिका दहनच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहणही लागणार आहे. त्यामुळे आर्थिक, व्यावसायिक, वैवाहिक आणि आरोग्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये चढ-उतार संभवतात.
मेष साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या व्यक्तींनी संयम राखणे आवश्यक आहे. मानसिक तणाव वाढू शकतो. उत्पन्न चांगले असले तरी अनावश्यक खर्च त्रासदायक ठरू शकतात. स्पर्धा परीक्षा आणि शिक्षणात अधिक परिश्रमांची गरज आहे. वैवाहिक आयुष्यात किरकोळ मतभेद संभवतात.
वृषभ साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशींसाठी आठवडा अनुकूल. उत्पन्नवाढ, करिअरमध्ये प्रगती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. प्रेमसंबंध आणि कुटुंबीय जीवनात सकारात्मक वातावरण राहील.
मिथुन साप्ताहिक राशीभविष्य (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लग्नस्थानी गुरु असल्याने भाग्याची साथ लाभेल. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रभाव वाढेल. उत्पन्नवाढ आणि कामाचा विस्तार संभवतो. प्रेमविवाहाचा विचार करणाऱ्यांनी घाई टाळावी.
कर्क साप्ताहिक राशीभविष्य (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक नुकसान संभवते; मात्र नंतर स्थिती सुधारेल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
सिंह साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)
सिंह राशींसाठी सावधगिरीचा इशारा. वाहन चालवताना किंवा प्रवासात काळजी आवश्यक. मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. आत्मविकासासाठी मात्र हा काळ अनुकूल.
कन्या साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीची संधी. स्पर्धा परीक्षेत यशाचे संकेत. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्याबाबत हलकीशी अस्वस्थता संभवते.
तूळ साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)
तूळ राशींना मानसिक तणाव जाणवू शकतो. निर्णयक्षमता कमी पडू शकते. कर्ज किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय पुढे ढकलावेत. उत्पन्नवाढीसाठी कष्ट करावे लागतील.
वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कुटुंबीय तणावाचा सामना करावा लागू शकतो. उच्च शिक्षणात यश. अनिद्रा किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते.
धनु साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशींसाठी सकारात्मक काळ. सुखसुविधांमध्ये वाढ. जमीन-जुमला, वाहन किंवा विवाह विषयक निर्णय अनुकूल ठरू शकतात. आत्मविश्वास दृढ राहील.
मकर साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशींनी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. बचतीत घट संभवते. शिक्षणात प्रगती होईल; मात्र प्रयत्नांवर भर द्यावा.
कुंभ साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशींसाठी मिश्र परिणाम. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत लाभ. आरोग्याबाबत दक्षता आवश्यक. धोकादायक गुंतवणूक टाळावी.
मीन साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
मीन राशींसाठी करिअरमध्ये चढ-उतार संभवतात. प्रवासात काळजी घ्यावी. वडिलांचे सहकार्य लाभेल. अध्यात्माकडे कल वाढेल. आठवड्याच्या शेवटी शुभवार्ता आणि प्रतिष्ठावाढीचे संकेत.
