Navpancham Rajyog: वैदिक ज्योतिषात देवगुरूला सर्वात प्रभावशाली आणि शुभ ग्रह मानले जाते. साधारणपणे गुरू एका राशीत सुमारे एक वर्ष राहतात, पण सध्या ते अतिचारी गतीने चालत आहेत. त्यामुळे २०२६ या वर्षात गुरू तीन वेळा राशी परिवर्तन करणार आहेत.

सध्या मिथुन राशीत आहेत आणि २ जून २०२६ पर्यंत ते याच राशीत असतील. या काळात इतर ग्रहांशी होणाऱ्या संयोग, दृष्टी आणि स्थानामुळे अनेक शुभ व अशुभ योग तयार होत आहेत.

भाग्याचा कारक असलेला गुरू आणि बुध ग्रह यांच्या संयोगाने नवपंचम राजयोग तयार होत आहे. हा योग ज्योतिषात खूप शुभ मानला जातो. त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दिसून येईल.

द्रिक पंचांगानुसार १७ फेब्रुवारी रोजी पहाटे २:५९ वाजता गुरू आणि बुध हे एकमेकांपासून १२० अंशांच्या अंतरावर असतील. त्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल. या काळात गुरू मिथुन राशीत असतील तर बुध कुंभ राशीत असतील.

हा राजयोग मेष आणि कुंभ या राशींच्या लोकांसाठी जास्त लाभदायक ठरू शकतो. करिअर, पैसा, शिक्षण आणि मान-सन्मान या क्षेत्रांत चांगले परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. हे संपूर्ण विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर केलेले आहे. चला तर मग, गुरू-बुध यांच्या संयोगाने तयार झालेला नवपंचम राजयोग कोणत्या राशींसाठी सर्वाधिक भाग्यवान ठरू शकतो ते पाहूया…

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरू यांच्या संयोगाने तयार झालेला नवपंचम राजयोग अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या गोचर कुंडलीनुसार बुध अकराव्या भावात असतील आणि गुरू तिसऱ्या भावात विराजमान असतील.

या ग्रहस्थितीमुळे उत्पन्न आणि लाभाच्या नव्या संधी मिळू शकतात. एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला असेल, तर त्याचा चांगला परिणाम मिळण्याची शक्यता आहे आणि तो परिणाम दीर्घकाळ टिकू शकतो. आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. कुटुंबासोबत सुखद आणि आनंदी वेळ घालवता येईल.

जर प्रॉपर्टी किंवा राजकारणाशी संबंधित एखादा विषय बराच काळ अडकलेला असेल, तर त्यात तोडगा निघण्याचे संकेत आहेत. यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे अनेक क्षेत्रांत यश मिळवता येईल.

नवपंचम राजयोगामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ त्यासाठी अनुकूल आहे. विशेषतः तंत्रज्ञान, आयटी किंवा ज्ञानाशी संबंधित क्षेत्रांत केलेले काम जास्त फायदेशीर ठरू शकते.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरू-बुध यांच्या संयोगाने तयार होणारा नवपंचम राजयोग अनेक बाबतीत खूप शुभ ठरू शकतो. या राशीत लग्न भावात बुध आणि पंचम भावात गुरू असतील. त्यामुळे आयुष्यातील अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची जोरदार शक्यता दिसत आहे. ज्या स्वप्नांसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होतात, ती आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढू शकते.

करिअरमध्ये अचानक यश आणि फायदा मिळण्याचे संकेत आहेत. याच काळात सूर्य आणि शुक्र ग्रहही कुंभ राशीत असल्यामुळे भाग्याची पूर्ण साथ मिळू शकते. बराच काळ रखडलेली कामे वेग घेऊ शकतात आणि त्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा होऊ शकते. उत्पन्न वाढेल आणि चांगली बचतही करता येईल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो आणि तुम्ही यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करू शकता. तुमचे काम आणि यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी गुरू-बुध यांच्या संयोगाने तयार झालेला नवपंचम राजयोग अनेक अर्थांनी खास ठरू शकतो. बुधसोबत राहूचाही संयोग होत आहे. गोचर कुंडलीनुसार बुध सहाव्या भावात आणि गुरू दहाव्या भावात विराजमान असतील. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा होण्याचे योग दिसत आहेत. या काळात नोकरी किंवा व्यवसायात केलेली कोणतीही योग्य योजना किंवा डावपेच यशस्वी ठरू शकतात. तुमचे तांत्रिक ज्ञान आणि अनुभव उपयोगी पडेल.

शिक्षणाच्या क्षेत्रात तुमची कामगिरी चांगली राहील. प्रवासाचेही योग आहेत, त्यामुळे मित्रांबरोबर किंवा कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन होऊ शकतो. बँकेकडून कर्ज मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घेतलेली मेहनत आणि केलेले प्रयत्न यश देऊ शकतात.

प्रेमसंबंधांच्या बाबतीत काळ तुमच्या बाजूने असेल. किरकोळ मतभेद होतील, पण नात्यातील प्रेम वाढतच जाईल. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनातही आनंद आणि समाधान टिकून राहील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)