Rahu Ketu Navpancham Yog : २ ऑगस्ट रोजी मंगळाने वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश केला आहे. या गोचरामुळे मंगळ आणि राहू यांच्या युतीमुळे नवपंचम योग निर्माण झाली आहे. हा योग १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सक्रिय राहील. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग सामान्यतः शुभ मानला जात असून या काळात मंगळ राहूपासून पाचव्या घरात आणि राहू मंगळापासून नवव्या घरात असेल. यालाच नवपंचम राजयोग म्हणतात. या शुभ योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घ्या.

मेष (Aries)

मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. त्यामुळे, हे गोचर तुमच्यासाठी विशेष मानले जात आहे. या योग सक्रिय असताना मेष राशीच्या लोकांचाआत्मविश्वास वाढू शकतो. तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात. अखेर तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळ मिळू शकते. तसेच शेअर बाजाराशी संबंधित लोकांना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. बक्कळ पैसा कमावण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाशी संबंधित लोकांनाही यश मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini)

मंगळाचा मिथुन राशीत प्रवेश होईल ज्यामुळे या राशीच्या लोकांना यामुळे नवीन ऊर्जा मिळेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली होईल. तसेच अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. अनेक मार्गांनी पैसा मिळेल त्यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ शुभ मानला जातो. तुम्हाला मागील अनुभवांचा फायदा होईल आणि आत्मविश्वास वाढेल.

तूळ (Libra)

हा योग तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या योगामुळे आयटी आणि तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. काही लोकांना अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो.

कुंभ (Aquarius)

हा योग कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक मानला जातो. ऊर्जा आणि उत्साह वाढू शकतो. तुम्ही तुमची ध्येये साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. करिअरमध्ये घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. उत्पन्न वाढण्याची चिन्हे आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक वातावरणही चांगले राहण्याची शक्यता आहे.