Rashi Bhavishya 11 october 2026 In Marathi : आज ११ ऑक्टोबर २०२६ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असणार आहे. आज वैधृती योग आणि चित्रा नक्षत्र जुळून येईल. राहू काळ ४ वाजून ३४ मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजून ०१ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त ११ वाजून ४४ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे. आज शैलपुत्री देवी तुमच्या राशीला कसं आशीर्वाद देणार जाणून घेऊया.

आजचे पंचांग व राशिभविष्य, १० ऑक्टोबर २०२६ (Dainik Rashi Bhavishya 10 october 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

जोडीदारामुळे आपला लाभ होईल. महत्त्वाच्या कामात त्यांची मदत घ्या. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. दिवस परोपकारात व्यतीत होईल. सकारात्मक राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करा.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी खरेदी टाळा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. मित्रांच्या भेटीचा आनंद घ्याल. प्रलंबित कामे मार्गी लावू शकाल.

दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. वडीलांच्या आशीर्वादाने मनातील इच्छा पूर्ण होईल. आपले मनोबल वाढीस लागेल. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना चांगली संधी मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

जोडीदाराशी सामंजस्याने वागा. छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. मान, प्रतिष्ठा वाढीस लागेल. वरिष्ठांची मर्जी ओळखून कामे करा.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

स्पर्धेत यश मिळवाल. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. प्रलंबित येणी प्राप्त होतील. व्यवसायिकांना फायदा देणार्‍या संधी समोर यातील. आनंदी दृष्टीकोन बाळगून राहाल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

नातेवाईकांच्या ओळखीचा लाभ होईल. आपले विचार लोकांसमोर मांडा. घेतलेले निर्णय लाभ मिळवून देतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. उगाचच चिडचिड करू नका.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

लोक तुमच्या कामात ढवळाढवळ करू शकतात. आपले निर्णय स्वत: घ्या. मिळकतीच्या नव्या संधी सामोर्‍या येतील. आपले स्पष्ट मत मांडाल. धावपळ व दगदग वाढेल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

घरातल्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. माहितगार लोकांना आपल्या विचारात सामील करून घ्या. प्रलंबित कामे मार्गी लावाल. बोलताना तारतम्यबाळगा. मित्राची भेट उपयुक्त ठरेल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

नोकरी, व्यवसायात उत्तम संधी लाभेल. अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. कार्यालयीन सहकार्‍यांशी सलोखा ठेवावा. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

मानसिक स्वास्थ्य जपावे. धार्मिक भावना वाढीस लागेल. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. भावंडांशी मतभेदाची शक्यता.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

व्यावसायिक नव्या जोमाने कामे करतील. दिवसाची सुरुवात धावपळीत होईल. अचानक खर्च उद्भवतील. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. नामस्मरण उपयुक्त ठरेल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

नोकरीची संधी चालून येईल. उगाच चिडचिड करू नका. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. दिवस धावपळीत जाईल. औद्योगिक वाढ सुखकारक ठरेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर