Horoscope Today 13 october 2026 In Marathi : आज १३ ऑक्टोबर २०२६ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. आज प्रीती योग आणि विशाखा नक्षत्र जुळून येईल. राहू काळ ३ वाजून २१ मिनिटांनी सुरु होईल ते ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त १२ वाजून १ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज नवरात्रीचा तिसरा दिवस असणार आहे. आज चंद्रघंटा देवीच्या रूपाची पूजा केली जाईल आणि आजचा रंग लाल असणार आहे. चंद्रघंटा देवी तुमच्या राशीला कसा आशीर्वाद देणार जाणून घेऊ.
आजचे पंचांग व राशिभविष्य, १३ ऑक्टोबर २०२६ (Today Horoscope 13 october 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
जुनी रखडलेली कामे सामोरी येतील. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. हास्य विनोदात दिवसाचा उत्तरार्ध जाईल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
विद्यार्थ्यानी आळस झटकून टाकावा. घरातील कामांमध्ये गुंग व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. दिनक्रम व्यस्त राहील. गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल.
दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
हस्तकलेला वाव द्यावा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बौद्धिक कस लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
लोकांना नवे ठेवायला जागा देऊ नका. आपण आपले काम करीत राहा. आवडी निवडी बाबत आग्रही राहाल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
कोणत्याही निर्णयात संभ्रम आड आणू नका. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जुगारात लाभ होऊ शकतो.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
घरासाठी नवीन खरेदी कराल. स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
मधाळ बोलून लोकांना आकर्षित कराल. उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. शारीरिक ताण जाणवेल. अतिरिक्त बोलणे टाळावे.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
जुन्या गैरसमजुती मनातून काढून टाका. आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. धार्मिक गोष्टीत दिवस व्यतीत कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. तरुण वर्गाकडून नवीन गोष्टी शिकाल.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
आपल्यामुळे इतरांची गैरसोय टाळा. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. मुलांची कृती आनंद दायक असेल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक समतोल साधावा. बोलताना भान राखावे. आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. कौटुंबिक शांतता महत्त्वाची.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
व्यायामाचा कंटाळा करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. हाता-पायांची काळजी घ्यावी. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल.
