Navratri Horoscope: हिंदू धर्मात शक्तीची उपासना करण्याचा सर्वात मोठा सण म्हणजे शारदीय नवरात्र. हा सण ऊर्जा, आनंद आणि भक्तीचा मानला जातो. द्रिक पंचांगानुसार, यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेने होणार आहे. या उत्सवाची सांगता 19 ऑक्टोबर (महानवमी) रोजी होईल. तर २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसरा साजरा केला जाईल.
यंदा अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या या नऊ दिवसांच्या उत्सवात एक अतिशय दुर्मिळ आणि खास खगोलीय योग जुळून येत आहे. जवळपास १०० वर्षांनंतर नवरात्रीच्या काळात देवगुरू गुरु आणि चंद्र यांच्या युतीमुळे ‘गजकेसरी राजयोग’ तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग पद, प्रतिष्ठा, भरपूर धन, बुद्धिमत्ता आणि भाग्य देणारा मानला जातो. आई दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करताना या विशेष योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे, ते जाणून घेऊया.
गजकेसरी योग म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय?
जेव्हा कुंडलीत किंवा गोचरात गुरु आणि चंद्र हे एकमेकांपासून केंद्रस्थानी (१, ४, ७ किंवा १०व्या भावात) असतात किंवा त्यांची युती होते, तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. यंदा नवरात्रीच्या पवित्र काळात हा योग तयार होत असल्यामुळे करिअर, आरोग्य आणि वैवाहिक जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
मेष (Aries)
नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला उत्साह आणि ऊर्जा जाणवेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील.
उपाय: देवी स्कंदमातेला लाल गुलाब आणि बेसनाचे लाडू अर्पण करा. ‘ॐ दुं दुर्गायै नमः’ या मंत्राचा जप करा.
वृषभ (Taurus)
खूप दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.
उपाय: देवी महागौरीला पांढरे चंदन आणि खडीसाखर अर्पण करा. लहान मुलींना खीर खाऊ घाला.
कर्क (Cancer)
या १०० वर्षांनंतर तयार होत असलेल्या गजकेसरी राजयोगाचा सर्वाधिक लाभ कर्क राशीच्या लोकांना मिळेल. मान-सन्मान वाढेल. अविवाहितांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे.
उपाय: देवी शैलपुत्रीला दुधापासून बनवलेला गोड पदार्थ अर्पण करा. पूजास्थळी चांदीचे नाणे ठेवा.
सिंह (Leo)
व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल. मात्र हंगामी आजारांपासून स्वतःची काळजी घ्या. जोडीदारासोबत धार्मिक स्थळाच्या प्रवासाचा योग आहे.
उपाय: देवी कालरात्रीला जास्वंदीचे फूल अर्पण करा. पिवळ्या फळांचे दान करा.
तूळ (Libra)
ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंधात आनंददायी बदल होऊ शकतात.
मकर (Capricorn)
जमीन किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते. सांधेदुखीची समस्या असल्यास काळजी घ्या. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल.
उपाय: देवी कात्यायनीला अत्तर आणि पांढरी फुले अर्पण करा. केशराची खीर नैवेद्य म्हणून दाखवा.
उपाय: देवी कालरात्रीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. सुका मेवा नैवेद्य म्हणून अर्पण करा.
कुंभ (Aquarius)
करिअरमध्ये येणारी नवीन आव्हाने भविष्यात मोठा फायदा करून देतील. दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवा. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा.
उपाय: देवी ब्रह्मचारिणीला चमेलीचे अत्तर अर्पण करा. अख्ख्या उडीद डाळीचे दान करा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
