2023 Horoscope: १२ राशींसाठी येणारे २०२३ हे नवीन वर्ष कसे असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य | Horoscope 2023: New year shani and guru will transit in 2023 know the yearly horoscope predictions of 12 zodiac signs | Loksatta

2023 Horoscope: १२ राशींसाठी येणारे २०२३ हे नवीन वर्ष कसे असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य

Horoscope २०२३: वर्ष २०२३ मध्ये शनि आणि गुरू आपली राशी बदलतील. २०२३ हे वर्ष सर्व राशींसाठी कसे असेल ते जाणून घेऊया.

2023 Horoscope: १२ राशींसाठी येणारे २०२३ हे नवीन वर्ष कसे असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य
फोटो: संग्रहित

2023 Yearly Horoscope: २०२३ हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी सुमारे दीड महिना बाकी आहे. त्याच वेळी, प्रत्येक व्यक्तीला हे जाणून घ्यायचे असते की नवीन वर्ष त्याच्यासाठी कसे असेल. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा नवीन वर्षात त्याच्या सोबत काय घडेल. आम्ही तुम्हाला सांगतो की २०२३ मध्ये अनेक लहान-मोठे ग्रह त्यांची राशी बदलतील. ज्यामध्ये शनि आणि गुरूचाही समावेश आहे. खरं तर जेव्हा गुरू मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. २०२३ हे वर्ष सर्व १२ राशींसाठी कसे असेल ते जाणून घेऊया…

मेष राशी

२०२३ हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत ठरू शकते. यासोबतच व्यवसायात नवे प्रयोग फायदेशीर ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात शब्द काळजीपूर्वक निवडावेत, अन्यथा संबंध बिघडू शकतात. नातेसंबंधांच्या बाबतीत हे वर्ष संमिश्र जाईल.

वृषभ राशी

२०२३ या वर्षी तुम्हाला तुमच्या करिअरबाबत खूप मेहनत करावी लागेल. कारण शनिदेव तुमच्या राशीतून चौथ्या भावात भ्रमण करतील. म्हणूनच कठोर परिश्रम केल्यानंतरच तुम्हाला फळ मिळेल. या वर्षी तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. तसंच या वर्षी तुम्ही परदेशातही प्रवास करू शकता.

( हे ही वाचा: पुढील ४ महिने ‘या’ राशींसाठी असतील अत्यंत शुभ; २०२३ वर्ष घेऊन येईल प्रचंड धनलाभाची संधी)

मिथुन राशी

२०२३ वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी थोडी संघर्षाची ठरू शकते. पण नंतर हळूहळू परिस्थिती सुधारेल. दुसरीकडे, शनिदेव तुमच्या कुंडलीच्या नवव्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे तुम्हाला मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळेल. सोबतच थांबलेली कामे पूर्ण करता येतील.

कर्क राशी

या वर्षी तुम्ही मालमत्तेच्या व्यवहारात चांगली कमाई करू शकाल. यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. दुसरीकडे, गुरु तुमच्या राशीतून दहाव्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे या वर्षी तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. विद्यार्थ्यांना यावर्षी विशेष यश मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

२०२३ या वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाची उत्तम शक्यता आहे. कारण गुरु तुमच्या कुंडलीच्या नवव्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे यंदा तुम्हाला नशीबाची साथ मिळताना दिसत आहे. तसेच, हे वर्ष सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरू शकते. दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

कन्या राशी

२०२३ वर्षी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. म्हणजे शेअर मार्केटमध्ये नफा होऊ शकतो. तसेच तुमच्या सहाव्या भावात शनि ग्रहाचे भ्रमण होईल. म्हणूनच या वर्षी तुम्ही कोणत्याही जुन्या आजारापासून मुक्त होऊ शकता. यासोबतच तुम्ही शत्रूंवर विजय मिळवू शकाल. नोकरी-व्यवसायासाठी हे वर्ष सरासरीचे आहे.

( हे ही वाचा: २०२३ मधील सुरुवातीचे ३ महिने ‘या’ राशींसाठी ठरतील शुभ; शनिदेवाच्या कृपेने मिळेल प्रचंड धनलाभाची संधी)

तूळ राशी

नवीन वर्ष २०२३ च्या सुरुवातीला मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. शनिदेव तुमच्या राशीच्या पाचव्या भावात भ्रमण करतील. यासोबतच तुम्हाला या काळात धनप्राप्ती होऊ शकते. शनिदेवाची दृष्टी तुमच्या राशीतून दहाव्या स्थानावर पडेल. म्हणूनच या वर्षी नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. यासोबतच तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कठोर परिश्रमाचे असेल, पण शेवटी यशही मिळण्याची शक्यता दिसत आहे.

वृश्चिक राशी

नवीन वर्षी तुम्ही तुमच्या धैर्यात आणि पराक्रमात वाढ पाहू शकता. दुसरीकडे, शनिदेव तुमच्या कुंडलीतील चौथ्या भावात प्रवेश करेल. म्हणूनच यावेळी तुम्हाला सर्व सुखे मिळू शकतात. तसेच, कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. पण व्यवहार करताना काळजी घ्या.

( हे ही वाचा: २४ नोव्हेंबर पासून ‘या’ राशींचे नशीब अचानक पालटणार? ‘हंस पंच महापुरुष योग’ बनल्याने या ५ राशी रातोरात बनू शकतात श्रीमंत!)

धनु राशी

२०२३ या वर्षी तुम्ही प्रेमप्रकरणात थोडे सावध राहावे. कारण एखाद्या विषयाबाबत तुमच्यात मतभेद होऊ शकतात. तसेच आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी फारसे चांगले जाणार नाही. परंतु शनिदेवाच्या प्रभावामुळे या वर्षी तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होणार आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना या वर्षी काहीशा निराशेचा सामना करावा लागू शकतो.

मकर राशी

या वर्षी तुम्हाला बऱ्याच चांगल्या बातम्या मिळू शकतात. नोकरीत वाढ आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून फायदा होऊ शकतो. या वर्षी तुम्हाला आर्थिक बाजूही मजबूत होताना दिसत आहे. कारण शनिदेव तुमच्या पारगमन कुंडलीच्या दुसऱ्या घरात जाईल. म्हणूनच ज्यांचे करिअर भाषण क्षेत्राशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अनुकूल ठरू शकते.

( हे ही वाचा: २०२२ च्या अखेरीस तयार होतोय ‘चतुर्ग्रही योग’; ‘या’ ३ राशींना प्रचंड धनालाभासोबत भाग्याचे मजबूत योग)

कुंभ राशी

शनिदेव या वर्षी तुमच्या पारगमन राशीच्या लग्न घरामध्ये भ्रमण करतील. त्यामुळे यावेळी तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. उत्पन्नात वाढ होऊ शकते. जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

मीन राशी

२०२३ हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र ठरू शकते. या वर्षी उत्पन्नात वाढ होईल, पण खर्चात वाढ होऊ शकते. हे वर्ष मुलाच्या बाजूने अनुकूल ठरू शकते. कुटुंबात काही चढ-उतार असू शकतात, परंतु तुम्ही ते सहज सोडवू शकाल. शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीतून दुसऱ्या घरात जाईल. त्यामुळे पैशांची आवक सुरू राहील.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2022 at 20:15 IST
Next Story
४७ वर्षांनी मंगळ वक्रीने तयार झाला अत्यंत अशुभ योग; महिनाभर ‘या’ ४ राशींनी ‘धन’ व ‘भान’ जपले नाहीतर…