Shani Blessing Birthdates: शनी हा एक अत्यंत आश्चर्यकारक ग्रह आहे. म्हणजे एखाद्याच्या नशिबाला पूर्णपणे कलाटणी देण्याची शक्ती या ग्रहापाशी आहे. २०२४ हे वर्ष शनीचे वर्ष म्हणून ओळखले जात आहे. अंकशास्त्रानुसार शनीची ८ या मूलांकावर विशेष कृपा असते. आपण २०२४ या वर्षातील आकड्यांची बेरीज केल्यास एकूण आकडा समोर येतो तो म्हणजे ८. त्यामुळेच ८ हा क्रमांक यंदाच्या वर्षाचा भाग्यांक असणार आहे. अंकशास्त्रानुसार भाग्यांक व मूलांक हे दोन्ही एखाद्या व्यक्तीच्या करिअर, आयुष्य, धन, आरोग्यावर विशेष परिणाम करू शकतात. शनीचे वर्ष त्यानुसारच काही मूलांकांसाठी विशेष असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र व अंकशास्त्रानुसार येणारे २०२ दिवस हे पुढील जन्मतारखांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात.

मूलांक म्हणजे काय?

मूलांक ही तुमच्या जन्मतारखेची जोड आहे, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २५ ऑगस्ट २००१ रोजी झाला असेल, तर तुमची मूलांक २+५ = ७ आहे. जर तुमची जन्मतारीख २० नोव्हेंबर २००५ असेल, तर तुमची मूलांक २+० = २ आहे. कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असेल.

मूलांक ७

महिन्याच्या ७, १६, २५ या तारखांवर जन्म झालेल्या मानलीनचा मूलांक असतो ७. या मूलांकावर २०२ दिवस शनीची कृपा असणार आहे. आपल्या रखडलेल्या कामांना या कालावधीत प्रचंड गती प्राप्त होईल परिणाम अडकून पडलेले पैसे सुद्धा परत येतील व आपल्या करिअरला वेगळी वळणे प्राप्त होतील. सिंगल किंवा विवाहइच्छुक मंडळींना आपल्याला हवा तसा जोडीदार लाभण्याची संधी आहे. आपल्याला केवळ आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे, विशेषतः ताण तणावातून दूरच राहावे.

मूलांक ६

महिन्याच्या ६, १५, २४ या तारखांवर जन्मलेल्या व्यक्तींसाठी पुढील २०२ दिवस लाभदायक सिद्ध होऊ शकतात. करिअरमध्ये प्रमोशनचे योग तयार होत आहेत. आर्थिक स्थैर्य अनुभवता येईल. मित्रांची साथ लाभेल. प्रेमसंबंध जपावे लागतील. रोमान्स अनुभवाल पण त्याही पेक्षा स्वतःसाठी वेळ काढल्याने आणखी समाधानी राहाल.

मूलांक ८

महिन्याच्या ८, १७, २६ या तारीखवार जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक असतो ८. या मूलांकावर तशीही शनीची कृपा आहेच त्यामुळे २०२ दिवस या मंडळींना फायद्याचेच असतील. आपल्याला नव्या कामाची सुरुवात करता येईल. त्यातून मोठा लाभ देखील संभवतो. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखादी आनंदवार्ता मिळू शकेल. आरोग्यात सुधारणा होईल.

हे ही वाचा<< लक्ष्मी नारायण २ जुलैपर्यंत ‘या’ ३ राशींच्या कुंडलीला देणार कलाटणी; तुमचे दार ठोठवणार धनलाभ व श्रीमंतीची संधी

मूलांक ५

महिन्याच्या ५, १४, २३ या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक असतो ५. येणारे २०२ दिवस या ५ मूलांक असलेल्या व्यक्तींसाठी लकी मानले जाते आहेत. या दिवसांमध्ये आपल्याला भरपूर प्रवासाच्या संधी मिळतील. परदेश प्रवासाचे सुद्धा योग आहेत. आपल्याला आर्थिक बळ लाभेल. नशिबाची तगडी साथ असेल, इतरांचं मन दुखावणं टाळा.

(टीप- वरील लेख व गृहितके व सामान्य ज्ञानावर आधारित आहे)