Nirjala Ekadashi 2026: वर्षातील सर्वात मोठी एकादशी लवकरच येणार आहे. २५ जूनला निर्जला एकादशी येणार आहे. या एकादशीला उपवास केल्यास सर्व २४ एकदशी इतके पुण्य मिळते असे भाविक मानतात. या दिवशी आणखी एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे ज्यानुसार, निर्जला एकदशीला लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण आहे. बुध आणि शुक्र ग्रह एक राशीमध्ये आल्यास लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होतो. निर्जला एकादशी दिवशी शुक्र आणि बुध ग्रह कर्क राशीत एकत्र येत आहे. चला जाणून घेऊ या दुर्मिळ संयोग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल.

वृषभ राशी (Turus)

करिअरच्या दृष्टीने तुमचे प्रयत्नांना चांगले यश मिळेल. दिर्घकाळापासून प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायासंबधी नव्या योजनामधून फायदा होईल. जे लोत नवीन दुकान किंवा स्टार्ट अप सुरु करू इच्छित आहे त्यांच्यासाठी चांगला काळ आहे. नोकरदार लोकांची पदोन्नती होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारल्याने वैवाहिक जीवनामध्ये चागले परिणाम मिळतील.

कर्क राशी (Cancer)

निर्जला एकादशीला लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्या राशीत निर्माण होत आहे. हा योग तुमची प्रगती आणि आर्थिक स्थिती सुधारेल याचा संकेत आहे. करिअरमध्ये करण्यात आलेली मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील ज्यामुळे तुमचे उत्पन्नात वाढ होऊ शकते. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. समाजात प्रतिष्ठा आणि सन्मान वाढण्याचे संकेत दिसत आहे. एखादी चांगली बातमी किंवा मोठी संधी मिळाल्याने मन आनंदी राहील.

तूळ राशी (Libra)

लक्ष्मी नारायण राजयोगामुळे तुमच्यासाठी प्रगतीचे दार उघडेल. दिर्घकाळापासून सुरु असलेल्या समस्या समाप्त होतील. नोकरी आणि व्यापारामध्ये केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिति सुधारल्याने कौंटुबिक नातेसंबधामध्ये सकारात्मक बदल होईल. मानसिक दबाव कमी होण्यामुळे मन संतुलित आणि शांत राहील. समाजामध्ये तुमचे मान-सन्मान वाढेल. आजारापणातून आराम मिळेल.

लक्ष्मी नारायण योग का शुभ मानला जातो?

ज्योतिष शास्त्रानुसार बुध शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योगामुळे सुख-समृद्धि आणि यशाचे प्रतिक मानले जाते. हा योग व्यक्तीला धन लाभ, भौतिक सुख आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. निर्जला एकादशीला शुभ तिथि निर्माण होणे अत्यंत एक शुभ आणि दुर्मिळ संयोग आहे.