November 2022 Last 5 Days Shani Budh Mangal Transit Will Give Wealth Money to Your Zodiac Signs Check Horoscope Today | Loksatta

२०२२ नोव्हेंबरच्या शेवटच्या ५ दिवसात ‘या’ राशींना अपार श्रीमंतीचे योग; तुम्हाला लक्ष्मीची साथ लाभणार?

November Month Transit 2022: २०२२ च्या शेवटच्या काही दिवसांमध्ये शनि, बुध, शुक्र, गुरु व मंगळ असे अनेक शक्तिशाली ग्रह गोचर करून अन्य राशींमध्ये स्थिर होणार आहेत.

२०२२ नोव्हेंबरच्या शेवटच्या ५ दिवसात ‘या’ राशींना अपार श्रीमंतीचे योग; तुम्हाला लक्ष्मीची साथ लाभणार?
नशिबाचे दार उघडून तुम्हालाही लक्ष्मी मातेचा धनलाभ रुपी आशीर्वाद लाभू शकतो. या पाच नशीबवान राशी कोणत्या हे जाणून घेऊयात..

November Month Transit 2022: २०२२ च्या शेवटच्या काही दिवसांमध्ये शनि, बुध, शुक्र, गुरु व मंगळ असे अनेक शक्तिशाली ग्रह गोचर करून अन्य राशींमध्ये स्थिर होणार आहेत. आता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या पाच दिवसांमध्ये या ग्रह संक्रमणाचे वेग व बळ वाढू शकते. नोव्हेंबर महिन्यात २०२२ वर्षातील शेवटचे चंद्रग्रहणही लागले होते. याचाही प्रभाव काही राशींमध्ये अद्याप कायम आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आता नोव्हेंबर महिना अखेरीस पाच राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. नशिबाचे दार उघडून तुम्हालाही लक्ष्मी मातेचा धनलाभ रुपी आशीर्वाद लाभू शकतो. या पाच नशीबवान राशी कोणत्या हे जाणून घेऊयात..

November Month Last Days Prediction: वृषभ

नोव्हेंबर महिना आपल्यासाठी शुभ होता व यापुढील पाच दिवस सुद्धा आपल्यासाठी अत्यंत खास असणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या पाच दिवसात तुमची वर्षानुवर्षे प्रलंबित कामे पार पडू शकतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बोनस किंवा बक्षीस अशा स्वरूपात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार छानसे सरप्राईज देऊन तुम्हाला खुश करू शकतो. महिलांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो, सासरी मान सन्मान वाढून तुम्हाला आनंद अनुभवता येऊ शकतो.

November Month Last Days Prediction: मिथुन

मिथुन राशीसाठी संपूर्ण नोव्हेंबर महिना हा काहीसा संमिश्र राहिला होता मात्र येत्या पाच दिवसात मिथुन राशीसाठो सोन्याहून पिवळा योग तयार होत आहे. या महिन्यात मिथुन राशीच्या व्यक्तींना माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो, याचा अर्थ येत्या काळात धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांना विरोध होऊ शकतो मात्र अखेरीस तुमचा निर्णय योग्य असल्याचे सर्वांना समजेल तोपर्यंत तुम्हीही आदळ आपट न करता शांत राहायला हवे. वैवाहिक आयुष्य सुखकर होऊ शकते.

हे ही वाचा<< ४७ वर्षांनी मंगळ वक्रीने तयार झाला अत्यंत अशुभ योग; महिनाभर ‘या’ ४ राशींनी ‘धन’ व ‘भान’ जपले नाहीतर…

November Month Last Days Prediction: सिंह

नोव्हेंबर महिन्याच्या उर्वरित पाच दिवसांमध्ये सिंह राशीच्या व्यक्तींची काही खास लोकांशी भेट होण्याचे योग आहेत, या व्यक्ती तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देऊन जातील. तुमच्या भावना अधिक संवेदनशील राहू शकतात ज्यामुळे छोट्या कारणानेही डोळ्यात पाणी तरळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मात्र तुमच्या फायद्याची राहू शकते. केवळ कामच नव्हे तर अन्यही अनेक मार्गांनी (गुंतवणूक, बक्षीस) माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देऊ शकते.

हे ही वाचा<< २०२३ फेब्रुवारीत शनिदेव होणार अस्त; ‘या’ राशींना लक्ष्मीची मिळू शकते साथ, मित्रांमुळे ‘असा’ होऊ शकतो धनलाभ

November Month Last Days Prediction: तूळ

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या पाच दिवसांमध्ये तूळ राशीची मंडळी खाजगी आयुष्यात बदल अनुभवू शकतात. आनंदाची बाब अशी की हे बदल तुमच्या नकळत तुमच्या प्रगतीचे कारण ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसह वाद होऊ शकतो यावेळी आपल्या वाणीवर नियंत्रण न ठेवल्यास परिस्थती बिकट होऊ शकते. कुणाचेही मन दुखावणे टाळावे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 10:47 IST
Next Story
Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २५ नोव्हेंबर २०२२