November Horoscope Lakshmi Yog: नोव्हेंबर २०२६ ची सुरुवात लक्ष्मी योगाने होणार आहे. चंद्र आणि मंगळ यांची युती झाल्यावर हा योग तयार होतो. १ नोव्हेंबर रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार असून, मंगळ आधीपासूनच कर्क राशीत असल्यामुळे लक्ष्मी योग तयार होईल. या योगामुळे कोणत्या राशींना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि त्यांच्या आयुष्यात कोणते बदल घडू शकतात, हे सविस्तर जाणून घेऊया.
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीच्या चौथ्या घरात लक्ष्मी योग तयार होणार आहे. या योगामुळे तुम्हाला शुभ फळ मिळू शकतात. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तसेच उत्पन्नाचे नवीन मार्गही खुले होऊ शकतात. चौथे घर हे जमीन आणि घराशी संबंधित मानले जाते. त्यामुळे या योगाच्या प्रभावामुळे तुम्ही जमीन किंवा घर खरेदी करू शकता. नोव्हेंबर महिन्यात तुमच्या साठवलेल्या पैशांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने या राशीच्या व्यावसायिकांच्या व्यवसायातही चांगली वाढ होऊ शकते.
कर्क रास
कर्क राशीतच लक्ष्मी योग तयार होत आहे. या काळात तुमच्या राशीचा स्वामी पहिल्या घरात असेल. त्यामुळे हा योग तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकतो. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. काही लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतूनही फायदा मिळू शकतो. लक्ष्मी योगाच्या प्रभावामुळे तुम्हाला मानसिक तणावातूनही आराम मिळू शकतो. वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांच्या लाभाच्या घरात लक्ष्मी योग तयार होणार आहे. या योगामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळवण्याच्या संधी मिळू शकतात. जे लोक शेअर बाजारात पैसे गुंतवतात, त्यांनाही गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धी नांदेल. तसेच तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
