November Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला धैर्य, पराक्रम, ऊर्जा, जमीन, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांचा कारक ग्रह मानले जाते. मंगळ जेव्हा राशी बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. पंचांगानुसार १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचे मानले जात आहे.
मंगळाच्या सिंह राशीतील प्रवेशामुळे मेष, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक प्रगती आणि कामाच्या ठिकाणी पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात, अशी ज्योतिषीय शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात मिळणारे परिणाम हे प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडली, ग्रहदशा आणि इतर ज्योतिषीय योगांवर अवलंबून असतात.
फ्युचर पंचांगानुसार ग्रहांचे सेनापती मानले जाणारे मंगळदेव १२ नोव्हेंबर रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. रात्री ८ वाजून १८ मिनिटांनी मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल आणि १० मार्च २०२७ पर्यंत याच राशीत राहील. त्यानंतर मंगळ कर्क राशीत वक्री होईल.
सिंह राशी (Leo Horoscope)
मंगळाचा गोचर सिंह राशीतच होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हे परिवर्तन विशेष महत्त्वाचे ठरू शकते. करिअरमध्ये स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना विस्तार करण्याची किंवा नवीन करारांमधून फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. मात्र, रागाच्या भरात किंवा घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळावे.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याने हा गोचर या राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. नोकरी आणि व्यवसायात केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढू शकतो आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचा सिंह राशीतील गोचर भागीदारी, व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक सक्रियता आणू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्कांमधून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पद आणि जबाबदारी वाढण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे फायदेशीर ठरेल. भागीदारीशी संबंधित कोणतेही कागदपत्र काळजीपूर्वक वाचूनच निर्णय घ्यावा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
