November Horoscope: गुरू आणि शनी यांच्यामध्ये षडाष्टक योग तयार होत आहे. या योगामुळे ३ राशींच्या लोकांना अशुभ परिणामांचा सामना करावा लागू शकतो. या राशींच्या लोकांसाठी करिअरमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.
गुरू गोचराचा प्रभाव
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रह गुरू ग्रहापासून आठव्या भावात असणार आहे. तसेच गुरू ग्रह शनीपासून सहाव्या भावात स्थित असणार आहे. गुरूच्या गोचरानंतर नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात अडचणी वाढू शकतात.
षडाष्टक योगाचा राशींवर होणारा परिणाम
षडाष्टक योग तयार झाल्यामुळे कन्या, मकर आणि मीन राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या राशींच्या लोकांनी करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया, या राशींवर काय परिणाम होऊ शकतो.
कन्या राशी (Virgo Zodiac Sign)
षडाष्टक योग तयार झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. या काळात तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पैशांच्या व्यवहारात अडकण्याची शक्यता आहे. कोणाला उधार दिलेले पैसे परत मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.
मकर राशी (Capricorn Zodiac Sign)
गुरू आणि शनी यांच्यामध्ये तयार होणाऱ्या षडाष्टक योगामुळे मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. तुम्हाला पैशांच्या बाबतीत त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच आयुष्यात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो.
मीन राशी (Pisces Zodiac Sign)
मीन राशीच्या लोकांनी या काळात विनाकारण जास्त खर्च करणे टाळावे. गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैसे गुंतवताना नीट विचार करा. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
