Numerology Predictions for 2025 Number 4: कुंडली शास्त्राच्या माध्यमातून व्यक्ती आणि तिचे भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे अंकशात्रात सोप्या गणिताचा आधार घेऊन व्यक्तीचे विविध पैलू आणि मानसिकता जाणून घेता येते. या संख्याशास्त्रात १ ते ९ अंकाची किमया आहे आणि या किमयेमध्ये पडद्याआड नऊ ग्रह उपस्थित असतात. या अंकशास्त्रात सध्या आपण मूलांकाचा वापर करून भविष्य निदान करणार आहोत. त्यामुळे तुमची जन्मतारीख दोन अंकांमध्ये असेल, तर तुम्हाला ती एका अंकात रूपांतरित करावी लागते. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख २२ असेल तर २+२=४. म्हणजे तुमचा मूलांक ४ आहे.

तर चार मूलांकाचे लोक स्वबळावर स्वभावतालचे जग बदलण्याची हिंमत मनात बाळगतात. यांना स्वतःचे काम स्वतःच करायला आवडते. त्याचबरोबर त्यांना जीवनात अनेक अडचणींना सामोरेसुद्धा जावे लागते. तर येणाऱ्या वर्षात त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या मित्रांकाची मदत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, एकूणच २०२५ हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी कसे जाणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
Surya Shani Yuti 2025
Surya Shani Yuti 2025: पिता-पुत्रांची होणार युती, सूर्य-शनिचा दुर्लभ योग ‘या’ चार राशींना देईल बक्कळ धनलाभ? गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
eople born on these dates can do love marriage
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेले लोक करतात लव्ह मॅरेज; प्रेमासाठी काहीही करतात
Six Planets yuti created Auspicious Sanyog at a time
एक दोन नव्हे तर सहा ग्रह एकत्र येणार अन् पाच राशींचे धनी होणार! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल

हेही वाचा…Astrology Predictions Number 3: ‘या’ जन्मतारखेसाठी २०२५ ठरेल मोठे बक्षीस! उत्तम आरोग्य, नोकरीत चांगले योग; वाचा काय म्हणतात ज्योतिषतज्ज्ञ…

ज्यांची जन्मतारीख ४,१३,२२ व ३१ आहे अशा लोकांचा मूलांक ४ असतो. या अंकावर हर्षल ग्रहाचा प्रभाव आढळतो. सध्या येणारे वर्ष २०२५ या वर्षाची बेरीज २+०+२+५= ९ आहे. ९ अंकाचा म्हणजेच मंगळाचा प्रभाव या मूलांकावर असणार आहे. त्यामुळे ४ मूलांकाला हर्षल बरोबर मंगळाची साथ लाभणार आहे. या दोघांच्याही एकत्र येण्याने उतावळेपणाचा वेग या तारखांमधून ४,१३,२२, ३१ जास्त प्रमाणात दिसून येईल, त्यामुळे खूप सावधतेने हा वर्षप्रवास करावा लागेल. श्रम आणि बुद्धीच्या जोरावर ही माणसे यश संपादन करत असतात. तसेच अतिशय न्याय बुद्धीने वागणारी असतात, त्यामुळे यांच्या परखड भूमिकेवर टीका होण्याची शक्यता दिसून येते.

त्यामुळे शांतपणे वागून निर्णय घ्यावे. उद्योगधंद्यात मूलांक १ आपल्याला खूप मदतीचा ठरेल. मूलांक १ ची निवड केल्याने आपल्यावरील खूप भार हलका होईल. शक्यतो काळा व लाल रंग कटाक्षाने टाळावा. २,४ व ७ या मित्रांकाच्या बाबतीत खूप हळवेपणा, प्रेम, भावनिक गुंतवणूक वाढेल. हळवेपणा हा पावसाच्या सरीप्रमाणे असतो, तो फारकाळ टिकत नाही. या वर्षातील ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने शुभदायक ठरतील. मूलांक ५ आपल्यासाठी खूप मदतीचा ठरेल. तर यापुढील लेखात आपण मूलांक ५ असणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत…

(सूचना : सध्या काही संख्याशास्त्र अभ्यासक चार अंकावर राहू ग्रहाचा अंमल आहे व ७ अंकावर केतू ग्रहाचा अंमल आहे असे मानतात. पण, जागतिक कीर्तीचे संख्याशास्त्रतज्ज्ञ कीरो माँट्रोज स्ट्रायहॉर्न (montrose Strayhorn) यांच्या लिखाणानुसार ४ व ७ मूलांक असणाऱ्या व्यक्तींवर हर्षल व नेपच्यून ग्रहाचा अंमल आहे. )

Story img Loader