Numerology Ank Jyotish Mulank Secrets: अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या मूल्यांकावरून त्याची ओळख, स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखले जाते. काही लोकांच्या शब्दांमध्ये एक अनोखे आकर्षण आणि जादू असते, ज्याद्वारे ते समोरच्या व्यक्तीला लगेच मोहित करतात. अशा व्यक्ती आपल्या बुद्धी आणि संवादकौशल्याच्या जोरावर कोणालाही सहजपणे जिंकून घेतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतके प्रभावी असते की, लोक आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होतात. नेमका हा मूल्यांक कोणता आहे ते जाणून घेऊ…

मूल्यांक ३

३ मूल्यांक असलेल्या लोकांचे संवादकौशल्य अत्यंत विलक्षण असते. त्यांच्या शब्दांमध्ये अर्थगर्भ खोलीआणि प्रभाव असतो, ज्यामुळे समोरची व्यक्ती लगेच प्रभावित होऊ शकते. लोकाच्या गर्दीतही ते स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकतात. हे लोक आपल्या चांगल्या बोलण्यातून विविध कामे मार्गी लावतात.

जेव्हा त्यांना कोणी आवडते, तेव्हा ते आपल्या शब्दांनी आणि विनोदबुद्धीने, त्या व्यक्तीला ते विशेष असल्याची जाणीव करून देतात. त्यांची संवादशैली इतकी आकर्षक असते की, समोरची व्यक्ती आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होते.

मूल्यांक ५

५ मूल्यांक असलेले लोक तल्लख बुद्धीचे, चपळ आणि दुसऱ्याशी अत्यंत जुळवून घेणारे असतात. ते कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्यात पारंगत असतात. ते प्रत्येक परिस्थितीवर पटकन आणि हुशारीने प्रतिक्रिया देतात.

त्यांचा विनोद आणि हलकीफुलकी चेष्टामस्करी लोकांना हसवते. ते मनमोकळे असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मजा येते. म्हणूनच लोकांना त्यांची सोबत आवडते.

मूल्यांक ६

६ मूल्यांक असलेले लोक स्वभावाने आकर्षक आणि रोमँटिक असतात. त्यांच्यामध्ये एक असे अनोखे आकर्षण असते, जे एकही शब्द न बोलता लोकांना स्वतःकडे खेचून घेतात. ते मनाने क्रिएटिव्ह आणि भावनिक असतात.

त्यांचा मृदू स्वभाव, शैली आणि बोलण्याची पद्धत इतरांना पटकन प्रभावित करते. एकदा ओळख झाली की, त्यांना विसरणे कठीण असते.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)