Numerology best career mulank : अंकशास्त्रानुसार, काही मूलांक असे असतात जे एक दिवस इतके यशस्वी होतात की पाहणारे थक्क होऊन जातात. मूलांक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज. जेव्हा तुम्ही तुमच्या जन्मतारखेची बेरीज करता, तो तुमचा मूलांक असतो. आज आपण अशा तीन मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत, जे आपल्या करिअरमध्ये वेगाने मोठ्या उंचीवर पोहोचतात.
मूलांक १
कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक १ असतो. या व्यक्तींवर सूर्याचा सर्वाधिक प्रभाव असतो, जो त्यांचा स्वामी ग्रह आहे. परिणामी, या व्यक्ती आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. त्यांच्यामध्ये प्रबळ नेतृत्वगुणही असतात, ते त्यांच्या क्षेत्रात एक अद्वितीय ओळख निर्माण करतात.
सूर्यामुळे मूलांक १ असलेले लोक उच्च पदांवर पोहोचतात. आदर आणि मान्यताही सहज मिळते. तथापि, यात कठोर परिश्रम आणि योग्य दिशा महत्त्वाची भूमिका बजावतात. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे याचे उत्तम उदाहरण आहेत. मूलांक १ असलेले लोक आपल्या नेतृत्वगुणांनी महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतात.
मूलांक ४
ज्यांचा मूलांक ४ आहे, त्यांच्यावर राहूचा सर्वाधिक प्रभाव असतो. कोणत्याही महिन्याच्या ४, १३ किंवा २२ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ४ असतो. राहूमुळे ते गर्दीत उठून दिसतील अशा प्रकारे वागतात, ज्यामुळे ते अद्वितीय ठरतात. राहूच्या मदतीने या मूलांकाचे लोक ज्या कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करतात, त्यात यश मिळवतात.
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलपती यांनी यावर्षी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आणि प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ज्यांचा मूलांक ४ असतो, त्यांना तंत्रज्ञान आणि संशोधनातही खूप रस असतो. राहू या मूलांक असलेल्या व्यक्तींना आकस्मिक यश मिळवून देतो.
मूलांक ९
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ९ असतो. त्यांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळाची ऊर्जा त्यांच्यामध्ये उत्साह आणि धैर्य भरते, यामुळेच मूलांक ९ असलेल्या व्यक्ती जोखीम पत्करायला घाबरत नाहीत, त्यांना आव्हानांना सामोरे जायलाही आवडते.
शशी थरूर यांचा मूलांक ९ आहे. मंगळाच्या ऊर्जेमुळे, मूलांक ९ असलेल्या व्यक्तींमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो, यामुळेच ते धोका पत्करायला घाबरत नाहीत.
ज्यांचा मूलांक १, ४ आणि ९ आहेत, त्यांचे नशीब क्षणार्धात बदलते. जर तुमचा मूलांक यापैकी एक असेल तर तुमची बलस्थाने ओळखा आणि योग्य दिशेने कठोर परिश्रम करा. असे केल्याने तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. योग्य दिशेने केलेले कठोर परिश्रम तुम्हाला एक यशस्वी व्यक्ती बनवतील.
(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
