Numerology Mulank : अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभाव आणि जीवनाबद्दल बरेच काही अंदाज बांधले जातात. अंकशास्त्रात एका विशेष मूलांकाचा उल्लेख आहे, ज्याच्याशी संबंधित पुरुष आपल्या पत्नीचे खूप लाड करतात. ते आपल्या पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. याच कारणामुळे त्यांना सर्वोत्तम पती म्हटले जाते. अशा पुरुषांचा मूलांक काय आहे जाणून घेऊ…

मूलांक २ असलेले पुरुष आपल्या पत्नीचा खूप आदर करतात. ते तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक २ असतो. चंद्र, जो आपल्या मनासाठी जबाबदार असलेला ग्रह आहे, तो या मूलांकाचा स्वामी ग्रह मानला जातो. चंद्रामुळे २ मूलांक असलेली लोक खूप संवेदनशील आणि भावनिक असतात.

पत्नीला देतात राणीसारखी वागणूक

असे म्हटले जाते की, ज्या पुरुषांचा मूलांक २ असतो ते सर्वोत्तम पती असतात, कारण ते आपल्या पत्नीला राणीसारखी वागणूक देतात. ते समाजात आणि कुटुंबासमोर नेहमी आपल्या पत्नीची खंबीरपणे बाजू घेतात. पत्नीच्या प्रत्येक लहान-मोठ्या गरजेची काळजी घेतात आणि तिला कधीही एकटे सोडत नाहीत.

भावनांचा करतात आदर

ज्या लोकांचा मूलांक २ असतो, ते आपल्या पत्नीच्या भावनांचा खूप आदर करतात. ते आपली मते पत्नीवर लादत नाहीत, तर काहीही करण्यापूर्वी तिचाच सल्ला घेतात, यामुळेच त्यांचा संसार इतका यशस्वी होतो.

मूलांक २ असलेल्या व्यक्ती खूप संवेदनशील असतात, ते आपल्या पत्नीचे बोलणे न विचारताही समजून घेतात. तिला आनंदी ठेवण्यासाठी ते नेहमी काहीतरी खास करतात.

शांत आणि समंजस

या मूलांकाचे पुरुष सहजासहजी रागवत नाहीत. पत्नीबरोबर वाद झाला तरी ते शांतपणे आणि हुशारीने तो सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या याच संयमामुळे त्यांचे नाते कधीही तुटत नाही.

मूलांक २ असलेले लोक नात्यांमध्ये खूप एकनिष्ठ असतात. एकदा का त्यांचे कोणाशी नाते जुळले की, ते त्यांना कधीही सोडून जात नाहीत, त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंब आणि पत्नी यापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉ़म याची पुष्टी करत नाही,)