Numerology Prediction : अंकशास्त्रामध्ये जन्मतारीखवरून व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावला जातो. काही विशिष्ट मूलांक असलेले लोक आयुष्याचा मनमुराद आनंद घेणारे मानले जातात. असे म्हटले जाते की, या लोकांना चांगल्या गोष्टी, फिरणे, उत्तम जेवण आणि मित्रांसह वेळ घालवणे आवडते. त्यांना तेच-तेच कंटाळवाणे रुटीन अजिबात आवडत नाही.
२. मूलांक ३ – मौज-मस्तीसह हवे असते काहीतरी नवीन अंकशास्त्रात मूलांक ३ चा संबंध गुरु ग्रहाशी (Jupiter) जोडला जातो. या मूलांकाचे लोक मनमिळाऊ, उत्साही आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहणारे असतात. त्यांना फिरायला जाणे, मित्रांसह वेळ घालवणे आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड असते. आपल्या आवडीच्या गोष्टींवर पैसे खर्च करताना ते मागे-पुढे पाहत नाहीत.
३. मूलांक ५ – फिरण्याचे असतात भारी शौकीन मूलांक ५ चा संबंध बुध ग्रहाशी (Mercury) मानला जातो. या मूलांकाचे लोक स्वातंत्र्यप्रिय, जिज्ञासू आणि बदल पसंत करणारे असतात. नवीन ठिकाणी जाणे, नवीन लोकांना भेटणे आणि वेगवेगळे अनुभव घेणे त्यांना खूप आवडते. एकाच रूटीनमध्ये राहिल्याने त्यांना पटकन कंटाळा येतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात रोमहर्षक अनुभव आणि मस्तीला खूप महत्त्व असते.
४. मूलांक ६ – लग्झरी आणि सौंदर्याचे असतात वेडे अंकशास्त्रात मूलांक ६ चा संबंध शुक्र ग्रहाशी (Venus) जोडला जातो. शुक्र ग्रह हा सुख-सुविधा, सौंदर्य आणि भौतिक गोष्टींचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच मूलांक ६ चे लोक शौकीन स्वभावाचे असतात. उत्तम कपडे, स्वादिष्ट जेवण, सुंदर ठिकाणे आणि आरामदायी जीवन त्यांना आकर्षित करते. स्वतःच्या सुखासाठी आणि आवडीसाठी पैसे खर्च करायला ते अजिबात घाबरत नाहीत.
५. मूलांक ९ – उत्साहाने जगणे असते पसंत मूलांक ९ चा संबंध मंगळ ग्रहाशी (Mars) मानला जातो. या मूलांकाचे लोक अतिशय ऊर्जावान, उत्साही आणि धाडसी स्वभावाचे असतात. त्यांना ॲडव्हेंचर, फिरणे आणि मित्रांसोबत ॲक्टिव्ह राहणे आवडते. जास्त विचार करत बसण्यापेक्षा आयुष्यातील प्रत्येक क्षण मोकळेपणाने जगण्यावर त्यांचा विश्वास असतो.
जन्मतारखेवरुन मूलांक कसा काढायचा?
मूलांक काढण्यासाठी तुमच्या जन्मतारीखची बेरीज करून ती एका अंकावर (Single Digit) आणली जाते. उदाहरणार्थ, जर कोणाचा जन्म १४ तारखेला झाला असेल, तर १+४ = ५ (मूलांक ५). तसेच २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक २+४ = ६ असेल.
