Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जन्मतारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमच्या करिअरमधील, स्वभाव, गुण, अवगुण अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख १० असेल तर तुमचा मूलांक १+०=१ म्हणजे १ आहे. दरम्यान, आज आपण अशा मूलांकाच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत जे कुठेही गेले तरी आपल्या हुशीरीने आणि गोड स्वभावाने सर्वांना आपलंस करतात. या मुलांकाच्या लोकांकडे अनेकजण सहज आकर्षितही होतात.
‘या’ मुलांच्या लोकांकडे लोक होतात सहज आकर्षित
मुलांक १
ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ आणि २८ तारखेला झालेला आहे अशा लोकांचा मूलांक १ आहे. हे लोक अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान असतात. या मूलांकावर सूर्य ग्रहाचा अधिक प्रभाव असतो ज्यामुळे या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता उत्तम असते. या आत्मविश्वासू आणि प्रगतशील असतात. या मुली कोणाच्या दबावाखाली राहू शकत नाहीत, त्यामुळे यांच्या हुशारीमुळे आपल्या क्षेत्रात इतरांच्या तुलनेत पुढे असतात.
मुलांक ३
३, १२, २१ व ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो, ते पैसे कमावण्यात तज्ज्ञ मानले जातात. गुरू ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे त्यांना आयुष्यात आर्थिक अडचणींचा क्वचितच सामना करावा लागतो. त्यांच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत असतात. त्याशिवाय, त्यांना पैसे वाचवण्याचीही चांगली सवय असते. त्यामुले त्यांचा खिसा कधीही रिकामा होत नाही. या लोकांमध्ये प्रबळ नेतृत्वगुण असतात. त्यांना दुसऱ्याच्या अधिकाराखाली काम करायला आवडत नाही. ते कठोर परिश्रमाने उच्च पदांवर पोहोचतात. त्याशिवाय, ते चांगले व्यावसायिकदेखील बनतात.
मुलांक ५
५, १५ किंवा २३ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. या संख्येवर बुध ग्रहाचे वर्चस्व असते; जो ज्योतिषशास्त्रात बुद्धी आणि ज्ञानाचा देव मानला जातो. ५ मूलांक असलेले लोक खूप बुद्धिमान असतात, स्वतःचे निर्णय घेण्यात पारंगत असतात. फक्त त्यांची आणि विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही मंडळी नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक यशस्वी होतात. त्यांची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीची समज त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. ही मंडळी जोखीम घेण्यास घाबरत नाहीत. शेअर बाजारात किंवा व्यवसायात नफा मिळवण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांच्या आयुष्यात अनेकदा आर्थिक प्रगती आणि समृद्धी येते; ज्यामुळे ते त्यांच्या प्रयत्नांनी लवकर श्रीमंत होतात.
मुलांक ९
९,१८,२७ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक ९ असतो. मूलांक ९ च्या व्यक्तींकडे अफाट मानसिक शक्ती आणि चिकाटी असते. एकदा का यांनी एखादी गोष्ट ठरवली, तर ती पूर्ण केल्याशिवाय हे शांत बसत नाहीत. अनेकदा त्यांचा हा स्वभाव इतरांना हट्टीपणाचा वाटू शकतो, परंतु हीच जिद्द त्यांना आयुष्यात मोठ्या शिखरांवर घेऊन जाते. वादात किंवा चर्चेत आपल्या मुद्द्यावर ठाम राहणे आणि तर्कशुद्ध मांडणी करून समोरच्याला निरुत्तर करणे, ही यांची सर्वात मोठी ताकद आहे. दृढनिश्चयी, ऊर्जा आणि धैर्याने परिपूर्ण असतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
