Holi 2025 : हिंदू धर्मात होळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्व जण आपापसांतील मतभेद विसरून, एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. या दिवशी काही लोकांचे नशीब पालटणार आहे. काही ठराविक तारखेला जन्मलेले लोकांना या दिवशी लक्ष्मीच्या कृपेने अपार धनलाभाचे योग दिसून येत आहे. या लोकांच्या घरी सुख समृद्धी आणि आनंद येईल. आज आपण लोकांविषयी जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रात, मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेतील अंकांची बेरीज करून मिळणारा अंक. खालीलपैकी तुमचा मूलांक कोणता आणि यंदाची होळी तुमच्यासाठी कशी असणार जाणून घेऊ या.
मूलांक १
मूलांक १ असणाऱ्या लोकांचा या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये मान सन्मान मिळणार. कोणत्याही नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करू शकतात. खूप जास्त भावनिक होण्यापासून स्वत:ला वाचवा. कोणतीही दुखद बातमी मिळू शकते.
मूलांक २
या आठवड्यात या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमचे भविष्य सुधारू शकते. या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. या लोकांचे इनकम वाढू शकते. हे लोक कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. या लोकांची सर्वत्र प्रशंसा होईल.
मूलांक ३
या मूलांकच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. या लोकांच्या प्रयत्नाने हे लोक आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. लव्ह लाइफ उत्तम राहीन. विवाहित लोकांचे आयुष्य चांगले राहीन. हे लोक कोणत्याही ट्रिपवर जाऊ शकतात.
मूलांक ५
या दरम्यान या लोकांना मोठे यश मिळू शकतात पण त्यासाठी या लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच या लोकांनी वेळोवेळी निर्णय घेणे गरजेच आहे. कामाच्या ठिकाणी कोणाबरोबर वाद घालू नका. शत्रुंशी भांडू नका. गुंतवणूक करताना काळजी घ्या अन्यथा नुकसान होऊ शकते.
मूलांक ६
मूलांक ६ असलेल्या लोकांना करिअरमध्ये प्रगती मिळण्याचे प्रबळ योग आहे. मोठे पद चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते. लव्ह लाइफ उत्तम होईल. जीवन अधिक सुखकर होईल. गुंतवणूक करताना विचार करावा.
मूलांक ७
मूलांक ७ असणाऱ्या लोकांना मोठे यश मिळू शकते. नवीन काम सुरू करण्यापूर्वी प्लानिंग करा. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. अतिरिक्त पैसा असेल तर गुंतवणूक विचारपूर्वक करा. लव्ह लाइफमध्ये तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप गैरसमज निर्माण करू शकतात.
मूलांक ८
करिअरमध्ये चांगला नफा मिळणार. आर्थिकबाबींसाठी हा आठवडा चांगला राहीन. कोर्ट प्रकरणात या लोकांच्या बाजून निर्णय येऊ शकतो. लव्ह लाइफमध्ये चांगली बातमी मिळेल. विवाह जुळवू शकता.
मूलांक ९
हा आठवडा मूलांक ९ असलेल्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतो. कामाचे ओझे भरपूर आहे. पण तुम्ही तुमच्या क्षमतेच्या जोरावर समस्या सोडवाल. जोडीदाराबरोबर नाते आणखी दृढ होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)