Numerology : ज्योतिषशास्त्रामध्ये, बारा राशींना अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच अंकशास्त्रामध्ये आकड्यांना खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक राशी व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी सांगते तसेच अंकशास्त्रामध्ये, व्यक्तीची जन्मतारीख ही अत्यंत महत्त्वाची असते. या जन्मतारखेवरून आपण व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य जाणून घेऊ शकतो. (numerology girls born on these dates will get money and wealth by maa Lakshmi grace)

जन्मतारखेवरून व्यक्तीचा मूलांक काढला जातो. मूलांक सुद्धा व्यक्तीचा स्वभाव, जीवन आणि करिअरविषयी माहिती देतो. अंकशास्त्रामध्ये एकुण १ ते ९ पर्यंत मूलांक असतात. जन्मतारखेत दोन एक अंकी संख्या असेल तर तोच त्या व्यक्तीचा मूलांक असतो पण जन्मतारखेत दोन अंकी संख्या असेल तर दोन्ही संख्या जोडून मूलांक काढला जातो.
उदा. जन्मतारीख २३ असेल तर त्या व्यक्तीचा मूलांत हा २+३ =५ असतो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : नोव्हेंबर महिन्यात ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा! ऐन दिवाळीत मिळणार अपार धनसंपत्ती

मूलांक १ असलेल्या व्यक्तीची जन्मतारीख १, १०, १९ आणि २८ या पैकी असू शकते.

प्रत्येक मूलांकचे एक विशेष महत्त्व आहे. आज आपण मूलांक १ असणाऱ्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक १ असतो. मूलांक १ असणारे लोक स्वातंत्र्य, महत्त्वकांक्षी आणि नेतृत्व क्षमता असणारे असतात.

जाणून घेऊ या मूलांक १ असलेल्या मुली कशा असतात?

मूलांक १ असलेल्या मुलींचा स्वभाव

अंकशास्त्रानुसार मूलांक १ असणाऱ्या लोकांचा संबंध थेट सूर्यदेवाबरोबर असतो. सूर्यदेवाला आत्मा, मान सन्मान आणि नेतृत्व क्षमतेचा कारक मानले जाते. ज्या मुलींचा मूलांक १ असतो, त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. या मूलांकच्या मुली त्यांच्या कार्यक्षेत्रात खूप नाव कमवतात आणि मोठी उंची गाठतात. एवढंच नाही तर त्या नेहमी ऊर्जावान असतात आणि स्वत:च्या मनाप्रमाणे जगतात. या मुली नेहमी रिस्क घेण्याची क्षमता ठेवतात.

हेही वाचा : धनत्रयोदशीपासून बक्कळ पैसा; त्रिग्रही योगाच्या प्रभावाने ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती कमावणार पैसा, मानसन्मान अन् भौतिक सुख

या मुलींवर असते लक्ष्मीची कृपा

या मुलींवर लक्ष्मीची कृपा नेहमी असते. तसेच यांना कधीही धनसंपत्तीची कमतरता जाणवत नाही. त्यांना कधीही आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही. लक्ष्मीच्या कृपेने ते आयुष्यात भरपूर धन आणि पैसा कमवतात.

Story img Loader