Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जन्मतारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमच्या करिअरमधील, स्वभाव, गुण, अवगुण अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख १० असेल तर तुमचा मूलांक १+०=१ म्हणजे १ आहे. दरम्यान, आज आपण अशा मूलांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे वर्चस्व घरात, मित्र-मैत्रिणींवर आणि कामाच्या ठिकाणीही पाहायला मिळते.
१ मूलांकाच्या मुली असतात कर्तृत्ववान
ज्या मुलींचा जन्म १, १०, १९ आणि २८ तारखेला झालेला आहे अशा मुलींचा मूलांक १ आहे. या मुली अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान असतात. या मूलांकावर सूर्य ग्रहाचा अधिक प्रभाव असतो ज्यामुळे या मुलींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता उत्तम असते. या आत्मविश्वासू आणि प्रगतशील असतात. या मुली कोणाच्या दबावाखाली राहू शकत नाहीत, त्यामुळे यांच्या हुशारीमुळे आपल्या क्षेत्रात इतरांच्या तुलनेत पुढे असतात.
९ मूलांकाच्या मुली असतात निर्भीड
ज्या मुलींचा जन्म ९, १८,२७ या तारखेला झालेला आहे अशा मुलींचा मूलांक ९ आहे. या मुली अतिशय उत्साही आणि निर्भीड असतात. या मूलांकावर मंगळ ग्रहाचा अधिक प्रभाव असतो ज्यामुळे या मुलींमध्ये दुसऱ्यांवर हुकुमत गाजवण्याची कला यांना अवगत असते. या मुली स्वतःच्या प्रगतीसह दुसऱ्यांना पुढे घेऊन जाण्यासही मदत करतात. विणाकारण त्रास देणाऱ्यांना या चांगलाच धडा शिकवतात. यांचा स्वभाव रागीट, निर्भीड असल्यामुळे अनेकजण त्यांच्या बोलायला घाबरतात. परंतु करिअरमध्ये या मुलींना भरपूर यश मिळते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
