या जन्मतारीखेचे लोक स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवतात, भरपूर पैसा आणि जीवनात सन्मान मिळतो

अंकशास्त्रानुसार आपल्या जीवनात संख्यांना महत्त्वाचे स्थान आहे. काही संख्या आपल्यासाठी शुभ असते तर काही संख्या अशुभ असते हे तुम्ही पाहिलेच असेल.

numerology-mulank-8

अंकशास्त्रानुसार आपल्या जीवनात संख्यांना महत्त्वाचे स्थान आहे. काही संख्या आपल्यासाठी शुभ असते तर काही संख्या अशुभ असते हे तुम्ही पाहिलेच असेल. १ ते ९ या अंकांचे वर्णन अंकशास्त्रात उपलब्ध आहे. तसेच, या ९ अंकांवर वेगवेगळ्या ग्रहांचे राज्य आहे.

अंकशास्त्रात शनी हा अंक ८ चा स्वामी मानला जातो. म्हणजे ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला झाला असेल, अशा लोकांचा मूलांक ८ होतो. हे लोक स्वभावाने गूढ असतात. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललं असेल याचा अंदाज कोणालाच येत नाही. तसेच हे लोक मेहनती असतात आणि स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवतात. त्यांना समाजात खूप मान मिळतो.

आणखी वाचा : सूर्य देवाचे नक्षत्र परिवर्तन, १५ दिवस ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळेल पैसाच पैसा!

या लोकांवर शनिदेव कृपा करतात
अंकशास्त्रानुसार राशी ८ च्या लोकांवर शनिदेव कृपाळू असतात. तसेच मूलांक क्रमांक ८ असलेले लोक खूप प्रामाणिक आणि मेहनती असतात. ते नेहमी इतरांना मदत करतात आणि सत्याचे समर्थन करतात. कोणतेही काम पूर्ण केल्यानंतरच ते श्वास घेतात. याचा अर्थ ते त्यांच्या ध्येयाबाबत खूप गंभीर असतात. तसेच हे लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात सहज यश मिळते. मात्र जीवनात यशस्वी होऊनही हे लोक साधे जीवन जगतात. हे लोक अतिशय गंभीर आणि शांत स्वभावाचे असतात.

आणखी वाचा : बुध ग्रहाचा लवकरच मिथुन राशीत प्रवेश, या राशींचे भाग्य बदलू शकते!

या क्षेत्रात यश मिळवतात:
अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक ८ असलेले लोक बहुतेक अभियंते किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित काम करतात. हे लोक चांगले उद्योगपती देखील होऊ शकतात. बिल्डिंग मटेरियल सप्लायर, लोखंड आणि तेलाशी संबंधित व्यवसाय त्यांना अधिक फायदा देतात. हे लोक पोलिस किंवा लष्करासारख्या सेवेतही काम करतात. यासोबतच हे लोक संशोधनाच्या क्षेत्रातही चांगले नाव कमावतात.

प्रेम जीवनात समस्या कायम:
या लोकांचे प्रेमसंबंध कायमस्वरूपी नसतात, अनेक वेळा ते आपल्या मनात प्रेम करत राहतात आणि ते व्यक्त करू शकत नाहीत. अनेकदा ते उशीरा लग्न करतात. त्यांचे त्यांच्या जोडीदाराशीही मतभेद होत असतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Numerology if this is the number of your birth date then shani will have special blessings you never face shortage of money in life prp 93

Next Story
आजचं राशीभविष्य, शनिवार, २५ जून २०२२
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी