अंकशास्त्रात (Numerology) मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेची एकूण बेरीज होय. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म एखाद्या महिन्याच्या १६ तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक १+६ = ७ असा असेल. अंकशास्त्रानुसार काही मूलांकांचे लोक ज्यांच्याशीही बोलतात, त्यांना आपलेसे करून घेतात. हे लोक आपल्या बोलण्याच्या जाळ्यात कोणालाही सहज अडकवू शकतात.
मूलांक १
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ असतो. अंकशास्त्रात या लोकांना जन्मजात नेतृत्वगुण असलेले (Leaders) मानले गेले आहे. या मूलांकाचा स्वामी ‘सूर्य’ आहे. सूर्याच्या प्रभावामुळे या लोकांमध्ये राजांसारखे गुण असतात.
मूलांक १ चे लोक जन्मजात लीडर असतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. ते आपले म्हणणे इतक्या स्पष्टपणे मांडतात की, समोरची व्यक्ती कोणतीही शंका न घेता त्यांचे ऐकते. ऑफिस असो की मित्रांचा ग्रुप, ते प्रत्येक ठिकाणी आपला दबदबा निर्माण करतात. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे ते कोणालाही आकर्षित करू शकतात.
मूलांक ६
ज्या लोकांची जन्मतारीख ६, १५ किंवा २४ असते, त्यांचा मूलांक ६ मानला जातो. या मूलांकाच्या लोकांवर ‘शुक्र’ ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्र हा ग्लॅमर, आकर्षण आणि प्रेमाचा कारक मानला जातो.
शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक अत्यंत आकर्षक, मनमिळाऊ आणि कलाप्रेमी असतात. त्यांचा स्वभाव अतिशय आनंदी असतो. ते इतर लोकांशी खूप लवकर जोडले जातात. आपल्या गोड बोलण्याने ते क्षणात कोणाचेही मन जिंकून घेतात. “गोड बोलून आपले काम करून घेणे” यात हे लोक पटाईत मानले जातात.
मूलांक ८
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची जन्मतारीख ८, १७ किंवा २६ असते, त्यांचा मूलांक ८ असतो. या मूलांकाच्या लोकांवर ‘शनि’ ग्रहाचा प्रभाव असतो. शनि हा शिस्त आणि न्यायाचे प्रतीक आहे.
या लोकांमध्ये अफाट संयम आणि उत्कृष्ट रणनीतिक चातुर्य (Strategic Mind) असते. ते खूप व्यावहारिक (Practical) असतात आणि पुराव्याशिवाय किंवा तथ्याशिवाय कोणतेही भाष्य करत नाहीत. आपल्या याच गंभीर, सुजाण आणि तार्किक विचारसरणीच्या जोरावर ते इतरांना खूप लवकर प्रभावित आणि प्रेरित करतात. मोठमोठे बुद्धिमान लोकही यांच्या सखोल विचारांसमोर टिकू शकत नाहीत. कार्यक्षेत्र असो वा सामाजिक जीवन, यांच्या बोलण्याची जादू अशी चालते की, भलेभले त्यांच्या तर्कांसमोर गुडघे टेकतात.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
