Numerology Love Compatibility : अंकशास्त्रात १ ते ९ या मूलांकांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो, ज्याचा थेट प्रभाव व्यक्तीच्या लव्ह लाईफवर आणि नातेसंबंधांवर पडतो. अंकशास्त्रानुसार, १ ते ९ मूलांकाच्या लोकांची लव्ह लँग्वेज आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत नेमकी कशी असते, ते सविस्तर जाणून घेऊया:
मूलांकानुसार लव्ह लँग्वेज (Love Language):
मूलांक १: या मूलांकाचे लोक आपल्या जोडीदाराला प्रत्येक गोष्टीत पूर्ण पाठिंबा देऊन आणि कौटुंबिक तसेच व्यावहारिक जबाबदाऱ्या पार पाडून आपले प्रेम व्यक्त करतात.
मूलांक २: हे लोक आपल्या भावना, काळजी घेण्याची वृत्ती आणि गोड-मऊ शब्दांतून जोडीदाराबद्दलचे प्रेम दाखवून देतात.
मूलांक ३: या लोकांना जोडीदाराची उघडपणे स्तुती करणे, हसणे-खिदळणे आणि रोमँटिक गप्पा मारणे खूप आवडते.
मूलांक ४: हे लोक अढळ विश्वास आणि आयुष्यातील कठीण प्रसंगांत सावलीसारखे खंबीरपणे पाठीशी उभे राहून आपले प्रेम सिद्ध करतात.
मूलांक ५: या मूलांकाचे लोक आयुष्यात सरप्राईज देणे, रोमान्स आणि मजेशीर गप्पांच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करतात.
मूलांक ६: हे लोक रोमान्स, छान भेटवस्तू (गिफ्ट्स) देणे आणि जोडीदाराच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेऊन प्रेम दाखवतात.
मूलांक ७: या मूलांकाचे लोक सखोल व अर्थपूर्ण चर्चा करून आणि आपला वैयक्तिक वेळ (मी टाईम) जोडीदाराबरोबर शेअर करून प्रेम व्यक्त करतात.
मूलांक ८: हे लोक आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडून तसेच जोडीदाराचे भविष्य आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सुरक्षित करून आपले प्रेम व्यक्त करतात.
मूलांक ९: मूलांक ९ चे लोक आपुलकी, तीव्र जिव्हाळा आणि गरजेच्या वेळी ढाल बनून जोडीदाराच्या पाठीशी उभे राहून प्रेमाची जाणीव करून देतात.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
