Numerology Father and Son Bond: कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. अंकशास्त्रानुसार या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. असे मानले जाते की, मूलांक २ चे तरुण स्वभावाने अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार असतात. त्यांच्यासाठी कुटुंबाचा आनंद सर्वात महत्त्वाचा असतो. विशेषतः वडिलांसह त्यांचे नाते खूप घट्ट असते. लहानपणापासूनच ते आपल्या लहान-मोठ्या गरजा आणि निर्णयांसाठी वडिलांचा सल्ला घेणे पसंत करतात.
वडिलांच्या आनंदाची घेतात काळजी
मूलांक २ असलेले तरुण आपल्या आई-वडिलांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात. कोणतेही काम करण्यापूर्वी ते विचार करतात की त्यांच्या निर्णयाचा कुटुंबावर काय परिणाम होईल. वडिलांचा सल्ला त्यांच्यासाठी खूप मोलाचा असतो आणि त्यांच्या आनंदासाठी ते अनेकदा स्वतःच्या आवडीनिवडीही बाजूला ठेवतात. आपल्या संवेदनशील स्वभावामुळे कुटुंबापासून दूर राहणे त्यांना सोपे जात नाही. त्यांना आपल्या आई-वडिलांसोबत वेळ घालवायला आवडते.
मूलांक ६ असलेले मुले
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ६ असतो. अंकशास्त्रानुसार या मूलांकाचा संबंध शुक्र ग्रहाशी मानला जातो. असे मानले जाते की, मूलांक ६ चे लोक नातेसंबंध जपण्यात पटाईत असतात. त्यांच्यासाठी आई-वडिलांचे स्थान खूप वरचे असते. विशेषतः ते वडिलांना आपला आदर्श मानतात आणि जीवनातील महत्त्वाच्या निर्णयात त्यांची मते आवर्जून घेतात.
वडिलांना मानतात आपले रोल मॉडेल
मूलांक ६ च्या मुलांची ही खासियत असते की, ते आपल्या आई-वडिलांची साथ सहसा सोडत नाहीत. आयुष्यात कितीही प्रगती केली तरी ते कुटुंबाशी आपले नाते घट्ट ठेवून असतात. वडिलांचे अनुभव आणि त्यांची शिकवण ते आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात. करिअर निवडण्यापासून ते वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या निर्णयांपर्यंत, वडिलांचा सल्ला त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. नात्यांमध्ये प्रेम आणि आदर टिकवून ठेवणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग मानला जातो.
मूलांक ७ असलेले मुले
कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो. अंकशास्त्रानुसार या मूलांकाचा स्वामी केतू मानला जातो. असे मानले जाते की, मूलांक ७ चे तरुण भावूक असण्यासोबतच धाडसी आणि निस्वार्थीही असतात. ते आपल्या मनातील गोष्ट प्रत्येकच व्यक्तीसह शेअर करत नाहीत, मात्र वडिलांसोबत त्यांचे नाते खूप सखोल असते. आयुष्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ते वडिलांचे विचार जाणून घेणे आवश्यक समजतात.
कठीण काळातही सोडत नाहीत साथ
मूलांक ७ असलेले मुले कुटुंबाप्रति असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडतात. आयुष्यात संकटे आली किंवा मोठे निर्णय घेण्याची वेळ आली, तर ते आपल्या वडिलांच्या शिकवणीला नेहमी लक्षात ठेवतात. त्यांच्यासाठी वडील केवळ कुटुंबाचे प्रमुख नसून एक उत्तम मार्गदर्शकही असतात. असे मानले जाते की ते आपल्या कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य देतात आणि कठीण काळातही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतात. वडिलांचा सल्ला त्यांना योग्य मार्ग निवडण्यास मदत करतो.
वडिलांशी राहते घट्ट नातं
अंकशास्त्रानुसार मूलांक २, ६ आणि ७ मधील मुले कुटुंबाप्रती अतिशय समर्पित मानली जातात. त्यांची खासियत केवळ वडिलांचे ऐकणे एवढीच नाही, तर त्यांच्या अनुभवांचा आणि भावनांचा आदर करणे ही सुद्धा आहे. हे तरुण आयुष्यात पुढे जातानाही कुटुंबाशी आपले नाते जोडून ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. वडिलांचा सल्ला त्यांच्यासाठी विश्वासाचा आणि योग्य मार्गदर्शनाचा एक उत्तम स्रोत असतो. तसेच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो आणि हे गुण प्रत्येकावरच सारख्या प्रमाणात लागू होतात असे नाही.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
