Numerology Mulank 2 Boys Personality : अंकशास्त्रानुसार मूलांकाचा आपल्या स्वभावावर, व्यक्तिमत्त्वावर आणि प्रेमाच्या नात्यांवर खूप मोठा प्रभाव पडतो. आज आपण ज्या मूलांकाबद्दल बोलत आहोत, त्याचा थेट संबंध मन आणि भावनांचे कारक ग्रह असलेल्या चंद्राशी आहे. तो मूलांक म्हणजे २. या मूलांकाच्या मुलांचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक असते. ते हुशार असण्यासह रोमँटिक, अत्यंत संवेदनशील आणि आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकण्यात पटाईत असतात. पण परफेक्ट लाईफ पार्टनर बनण्यासाठी मूलांकच्या २ च्या लोकांमध्ये कोणत्या ४ गोष्टी विशेष असतात जाणून घेऊ…

मूलांक २ च्या मुलांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा काळजी घेणारा स्वभाव. चंद्राच्या प्रभावामुळे ही मुले मनाची खूप स्वच्छ असतात आणि इतरांच्या भावनांचा खूप आदर करतात. ते आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक लहान-लहान गरजांची विशेष काळजी घेतात आणि न सांगताच त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट समजून घेतात.

मूलांक २ ची मुले खूप प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात. ते आपले नाते पूर्ण निष्ठेने जपतात. कधीही कोणाला धोका देत नाहीत. आपल्या जोडीदाराला खास फिल करून देण्याची एकही संधी ते हातातून जाऊ देत नाहीत.

मूलांक २ च्या मुलांचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते उत्तम श्रोते असतात. ते आपल्या जोडीदाराचे म्हणणे केवळ पूर्ण लक्ष देऊन ऐकत नाहीत, तर गरज पडल्यास त्यांना योग्य तो सल्लाही देतात. एक उत्तम श्रोता असल्यामुळे त्यांच्या नात्यात गैरसमज फार वेळ टिकत नाहीत आणि कोणतेही भांडण जास्त लांबत नाही.

चंद्राच्या शीतकलेचा प्रभाव मूलांक २ च्या मुलांच्या स्वभावातही स्पष्टपणे दिसून येतो. त्यांना भांडणे आणि कटकटीपासून दूर राहणे आवडते. याच कारणामुळे त्यांचे कोणतेही मतभेद जास्त काळ टिकत नाहीत. ते विषय मिटवून पुढे जाण्यावर विश्वास ठेवतात.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)