Numerology : अंकशास्त्रात असे काही खास मूलांक असतात ज्यांच्या लोकांना भगवान शिवांची अशी दिव्य कृपा लाभते की त्यांचे नशीब एका रात्रीत बदलू शकते. त्यांच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा एखादी अडचण येते, तेव्हा भोलेनाथ स्वतः त्यांना मार्ग दाखवतात. या मूलांकाचे लोक मनाचे अतिशय साफ आणि कष्टाळू असतात. ते साधे जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात आणि दिखाव्यापासून पूर्णपणे दूर राहतात. त्यांचा हाच सरळ आणि साधा स्वभाव भगवान शंकरांना खूप आवडतो. याच कारणामुळे त्यांना प्रत्येक कामात ईश्वराचा आशीर्वाद मिळतो. चला तर मग जाणून घेऊया हे कोणत्या मूलांकाचे लोक आहेत.

भगवान शिवांचा प्रिय मूलांक?

अंकशास्त्रानुसार, मूलांक २ च्या लोकांवर भगवान शिवांची विशेष कृपा असते, कारण महादेव हे या मूलांकाचे आराध्य दैवत आहेत. असे म्हटले जाते की, या मूलांकाच्या लोकांचे जीवन कितीही संघर्षाने भरलेले असले, तरी जेव्हा महादेवांची कृपा होते, तेव्हा त्यांचे नशीब एका रात्रीत पालटते. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ या तारखेला झाला आहे, ते सर्व लोक मूलांक २ अंतर्गत येतात.

मूलांक २ चे लोक असतात सरळ आणि साधे

मूलांक २ चा स्वामी ग्रह चंद्र आहे, ज्याला मन आणि भावनांचा कारक मानले जाते. चंद्राच्या प्रभावामुळेच या मूलांकाचे लोक खूप भावनिक (इमोशनल) स्वभावाचे असतात. त्यांना कोणाचेही दुःख सहन होत नाही आणि ते लगेच मदतीसाठी तयार होतात. त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा कपट किंवा अढी नसते. ते इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि त्यांच्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही, असा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो.

मूलांक २ च्या लोकांची खास वैशिष्ट्ये:

  • मूलांक २ चे लोक अत्यंत निष्पाप, साधे आणि संवेदनशील असतात.
  • त्यांच्या मनात कोणाबद्दलही फार काळ राग राहत नाही.
  • या मूलांकाच्या लोकांमध्ये कमालीची सहनशीलता असते.
  • हे लोक इतरांच्या आनंदासाठी स्वतः कडू घोट पितात, पण कोणाकडेही तक्रार करत नाहीत.
  • ते इतरांचे दुःख खूप लवकर आपले मानतात आणि मदतीसाठी धावून जातात.
  • ते खूप चांगले मित्र आणि जोडीदार सिद्ध होतात.
  • हे लोक अत्यंत सर्जनशील (क्रिएटिव्ह) असतात.
  • ते आपल्या वर्तनाने समोरील व्यक्तीवर लगेच प्रभाव पाडतात.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)