Numerology Mulank 3 6 : ज्योतिषशास्त्रात, संपूर्ण कुंडली पाहून सर्व काही कळू शकते. त्याप्रमाणे अंकशास्त्रात जन्मतारखेवरून सर्व काही कळू शकते. अंकशास्त्रामध्ये १ ते ९ पर्यंतच्या अंकांचा संदर्भ असतो, ज्यांना मूल्यांक म्हणतात. मूल्यांक म्हणजे कोणात्याही व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज. जन्मतारखेची बेरीज करून काढलेल्या मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि एकूण वैयक्तिक जीवनाचा अंदाज बांधता येतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही मूलांकांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या व्यक्ती कधीही कोणालाही निराश करीत नाहीत, नेहमी ते दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करतात.

इतरांच्या सुखात मानतात आनंद

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक ३ असतो, त्यांना कोणालाही निराश करायला आवडत नाही. कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह गुरू असतो. स्वतःकडे अनेक गोष्टींची, सुखसोईंची कमतरता असतानाही या मूलांकाची व्यक्ती इतरांना मदत करण्यास नेहमी तयार असते. अंकशास्त्रानुसार, हे लोक स्वभावाने अत्यंत उदार, निःस्वार्थी आणि आशावादी मानले जातात.

मूलांक ३ असलेल्या लोकांची वैशिष्ट्ये

मूलांक ३ असलेले लोक बुद्धिमान, सर्जनशील आणि स्वभावाने स्वतंत्र असतात. ते नेहमी इतरांच्या सुखात आनंदी होतात. कठीण काळातही सकारात्मक विचार टिकवून ठेवतात आणि इतरांना प्रेरणा देतात. त्यांच्याकडे पैसा नसला तरी ते आपल्या बुद्धिमत्ता आणि धैर्याने लोकांना निराश करत नाहीत. हे लोक खूप धाडसी आणि मेहनती असतात, असे मानले जाते.

मूलांक ३ असलेले लोक सहजासहजी हार मानत नाहीत आणि कठोर परिश्रमाने यश मिळवतात. या लोकांना दुसऱ्या कोणापुढेही झुकणे आवडत नाही.

३ या मूलांकाव्यतिरिक्त ६ हा मूलांक असलेले लोक त्यांच्या करुणा आणि सेवेसाठीदेखील ओळखले जातात. अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ६ असतो. या मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो, जो प्रेम, सौंदर्य आणि संपत्तीशी संबंधित आहे. परिणामी, ६ मूलांक असलेले लोक आकर्षक, प्रेमळ आणि शांत स्वभावाचे असतात.

(टीप- वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)