Numerology Predictions: गुरु ग्रहाने आज म्हणजेच २ जून २०२६ रोजी कर्क राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषानुसार गुरुची ही चाल मूलांक ३ असणाऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. ज्यांची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे त्यांचा मूलांक ३ असतो. या मूलांकावर गुरु गोचराचा अत्यंत शुभ परिणाम होईल.

भाग्य आधीपेक्षा जास्त मजबूत होईल आणि करिअरमध्ये उत्तम यश मिळण्याची शक्यता राहील. चला आता सविस्तर जाणून घेऊया की गुरुचा गोचर मूलांक ३ लोकांवर कसा प्रभाव टाकेल.

प्रत्येक कामात यश मिळेल

मूलांक ३ असणाऱ्यांना प्रत्येक कामात यश मिळण्याचे योग तयार होतील. आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होईल. जे लोक मानसिक त्रासातून जात आहेत त्यांना आराम मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. तसेच व्यवसाय करणारे लोकही चांगला नफा कमावतील.

आर्थिक स्थिती मजबूत होईल

मूलांक ३ असणाऱ्यांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहील. आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होईल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कोणत्याही कामातून चांगला पैसा मिळण्याचे प्रबळ योग आहेत. जुने कर्ज फेडले जाईल. बुद्धीच्या जोरावर चांगला पैसा कमावण्यात यश मिळेल. या काळात तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल.

मोठी डील फायनल होईल

मूलांक ३ असणाऱ्यांची मोठी डील फाइनल होऊ शकते, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. घर किंवा वाहन सुख मिळण्याचे शुभ योग तयार होत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)