Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र हे व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्याचा अंदाज वर्तवते. या अंकज्योतिष शास्त्रात १ ते ९ मूल्यांकांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. या मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो, ज्याचा प्रभाव व्यक्तीच्या स्वभाव, आवडी आणि एकूण आयुष्यावर होतो, असे मानले जाते. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक ६ असतो, त्यांचे व्यक्तिमत्व अद्वितीय असते.

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा अंक ६ असतो, त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय असते, ज्यामुळे ते गर्दीतही उठून दिसतात. कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ६ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह शुक्र आहे, जो संपत्ती, समृद्धी, आनंद, आकर्षण व सौंदर्य यांचा घटक मानला जातो.

चेहऱ्यावर असते एक अदभुत तेज

ज्या लोकांचा मूलांक ६ असतो, त्यांच्या चेहऱ्यावर एक अदभुत तेज असते, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांच्या चेहऱ्याकडून एक सकारात्मक ऊर्जा मिळते, ज्यामुळे त्यांच्या सभोवतालचे वातावरणही सकारात्मक, आनंदी असते.

ज्या लोकांचा मूलांक ६ असतो, ते खूप आनंदी असतात आणि परिस्थिती कोणतीही असो; ते कधीही धीर सोडत नाहीत. त्यामुळे ते कधी तुम्हाला चिंतेत दिसणार नाहीत आणि ते त्यांच्या सभोवतालचे वातावरणही आनंददायी ठेवतात.

मूलांक ६ चा अधिपती ग्रह शुक्र आहे आणि म्हणूनच या लोकांना संपत्तीची कधीच कमतरता भासत नाही. ते आलिशान जीवनशैलीचा आनंद घेतात आणि जीवनातील प्रत्येक सुखसोय व चैनीचा उपभोग घेतात.

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक ६ असतो, ते आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना मदत करण्यास नेहमी तयार असतात. ते स्वतःच्या प्रगती आणि कल्याणासह इतरांच्या हिताचीही काळजी घेताना दिसतात.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे,लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)