Numerology : अंकशास्त्रात जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मूलांकाला विशेष महत्त्व दिले जाते. मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य या दोन्ही गोष्टी समजतात. एवढेच नाही, तर कोणत्या वयात व्यक्तीला अपयश किंवा यश मिळेल, याचा अंदाजही यावरून लावता येतो.

काही मूलांकांच्या व्यक्तींना आयुष्याच्या सुरुवातीला अपयश, अडथळे आणि समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, याच अनुभवांतून धडा घेऊन वय वाढेल तसे ते अधिक जबाबदार होतात.

मूलांक ८: उशिरा कळते जबाबदारीची जाणीव

कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. अंकशास्त्रात या अंकाचा संबंध ‘शनी’ ग्रहाशी जोडला गेला आहे. शनि हा कर्म, न्याय आणि शिस्तीचा कारक मानला जातो.

या मूलांकाच्या लोकांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा हे लोक कामाच्या बाबतीत आळशी किंवा निष्काळजी बनतात, तसेच ते जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात.

वयाच्या तिशीनंतर होतो मोठा बदल

शनीचा प्रभाव व्यक्तीला वेळेनुसार जबाबदार बनवतो. त्यामुळे मूलांक ८ च्या लोकांमध्ये वयाच्या तिशीनंतर गांभीर्य आणि जबाबदारीची जाणीव वाढू लागते. मिळालेले अपयश आणि संघर्ष त्यांना चुकांची जाणीव करून देतात, ज्यामुळे ते कुटुंब आणि करिअरबाबत अधिक गंभीर होतात.

मूलांक ४: स्वभावातील बदल

४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो. या अंकाचा स्वामी ‘राहू’ मानला जातो. हे लोक स्वतःच्याच विश्वात रमणारे आणि वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारे असतात.

सुरुवातीच्या वयात मूलांक ४ चे लोक घाईघाईने निर्णय घेतात. त्यांच्या योजना व्यवस्थित नसल्यामुळे अनेकदा त्यांना मोठे नुकसान किंवा अपयश सहन करावे लागते.

धक्क्यांमधून शिकतात योग्य मार्ग

मूलांक ४ च्या लोकांना आयुष्यात मोठा धक्का बसतो किंवा परिस्थिती बिकट होते, तेव्हाच त्यांना योग्य आणि अयोग्य यांतील फरक समजतो. अनेक वाईट अनुभवांनंतर त्यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल होतो. वयाच्या तिशीनंतर त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि जबाबदारी येते.

त्यामुळे अंकशास्त्रानुसार, मूलांक ८ आणि ४ च्या लोकांना यश सहजासहजी मिळत नाही, तर संघर्षातून मिळालेल्या अनुभवांनंतरच यश प्राप्त होते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)