Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्याचा अंदाज वर्तवला जातो. या अंकज्योतिष शास्त्रात १ ते ९ मूल्यांकांच्या संदर्भात सविस्तर माहिती आहे. या मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो, ज्याचा प्रभाव व्यक्तीच्या स्वभाव, आवडी आणि एकूण आयुष्यावर होतो, असे मानले जाते. या महिन्याच्या ३, १२, २१ व ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा अंक ३ असतो. या अंकाच्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू असतो. असे म्हटले जाते की, त्यांना संपत्ती आणि समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही.
गुरू ग्रहाच्या आशीर्वादाने ३ मूल्यांक असलेल्या व्यक्ती खूप बुद्धिमान, दूरदृष्टी व महत्त्वाकांक्षी असतात. ते नेतृत्त्व करणारे आणि मनी मॅग्नेट असतात. असे म्हटले जाते की, त्यांच्याकडे संपत्ती आकर्षित करण्याची कला असते. ते अशा प्रकारे वागतात की, पैसा आपोआप त्यांच्याकडे येतो. त्यांच्याकडे ज्ञानाची कमतरता नसते आणि ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भरपूर पैसा कमावतात. चला तर मग जाणून घेऊया ३ मूल्यांक असलेले लोक कोणत्या वयात प्रचंड यश मिळवतात आणि त्यांचा स्वभाव कसा असतो.
३ मूल्यांक असलेल्या व्यक्तींची ताकद
संपत्ती आकर्षित करण्याची क्षमता – ज्यांचा मूल्यांक ३ असतो, ते पैसे कमावण्यात तज्ज्ञ मानले जातात. गुरू ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे त्यांना आयुष्यात आर्थिक अडचणींचा क्वचितच सामना करावा लागतो. त्यांच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत असतात. त्याशिवाय, त्यांना पैसे वाचवण्याचीही चांगली सवय असते. त्यामुले त्यांचा खिसा कधीही रिकामा होत नाही.
उत्कृष्ट नेतृत्वगुण – ३, १२, २१ व ३० तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये प्रबळ नेतृत्वगुण असतात. त्यांना दुसऱ्याच्या अधिकाराखाली काम करायला आवडत नाही. ते कठोर परिश्रमाने उच्च पदांवर पोहोचतात. त्याशिवाय, ते चांगले व्यावसायिकदेखील बनतात.
बुद्धिमान आणि हुशार – ज्यांचा मूल्यांक ३ असतो, ते अत्यंत बुद्धिमान आणि नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक असतात. त्यामुळेच त्यांना प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान असते. त्यांची तीक्ष्ण बुद्धी आणि उत्कृष्ट संवाद कौशल्ये त्यांना जीवनात मोठे यश आणि आदर मिळवून देतात.
३ मूल्यांक असलेल्या व्यक्तींना कोणत्या वयात प्रचंड यश मिळते?
३ मू्ल्यांक असलेल्या व्यक्ती लहानपणापासूनच हुशार असतात; पण एका विशिष्ट वयानंतरच त्यांना खरी प्रगती दिसू लागते. त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा टप्पा वयाच्या २१ व्या वर्षी येतो, जिथे त्यांना त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा सापडते. त्यानंतर वयाच्या ३० व्या वर्षी, त्यांची पैसा आकर्षित करण्याची क्षमता सक्रिय होते. जर ते नोकरी करत असतील, तर ते अनेकदा उच्च पद मिळवतात आणि जर ते व्यवसायात असतील, तर ते भरघोस नफा कमावतात. वयाच्या ३३ ते ३९ वर्षांदरम्यान, ते त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च शिखरावर पोहोचतात. या काळात त्यांच्याकडे कशाचीही कमतरता नसते.
(टीप – वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट. कॉम याची पुष्टी करत नाही.)
