Numerology : अंकशास्त्रानुसार, प्रत्येक तारीख आणि मूलांकाचे आपले एक वेगळे महत्त्व असते. यामध्ये १ ते ९ पर्यंत मूलांक असतात आणि त्यांचे नऊ वेगळे स्वामी ग्रह आहेत. याच ग्रहांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा, विचारसरणी आणि यशावर पडतो. यामध्ये जर आपण मूलांक ४ बद्दल जाणून घेऊ.
‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक असतो ४
मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे, जो एक छाया ग्रह मानला जातो. कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो. त्यांचा स्वामी ग्रह राहू आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहाकडे केवळ शीर (डोके) आहे. याच कारणामुळे या तारखांना जन्मलेले लोक अत्यंत तल्लख बुद्धीचे, हुशार आणि तितकेच हट्टी असतात. ते जे करायचे ठरवतात, ते पूर्ण करूनच श्वास घेतात. हे लोक प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजेच चौकटीबाहेरचा (Out of the box) विचार करतात आणि तसेच काम करतात.
१. आयुष्यात येतात अनेक चढ-उतार
या लोकांच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांची अति-काल्पनिक आणि क्रांतिकारी विचारसरणी होय. जिथे इतर लोकांचा विचार संपतो, तिथून या लोकांचा विचार सुरू होतो. हे लोक जुन्या गोष्टींवर आणि परंपरांवर फारसा विश्वास ठेवत नाहीत.
२. स्वभावाने हट्टी, पण मनाचे साफ
मूलांक ४ चे लोक स्वभावाने खूप हट्टी असतात. त्यांनी जे ठरवले, ते ते करूनच दाखवतात. मात्र, ते मनाचे तितकेच साफ असतात. हे लोक कोणाशीही कपट किंवा फसवणूक करत नाहीत. एका उघड्या पुस्तकाप्रमाणे ते समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर चांगले किंवा वाईट स्पष्टपणे बोलतात. ते स्पष्टवक्ते आणि अत्यंत प्रामाणिक मित्र असतात.
३. वर्कहॉलिक असतात हे लोक
मूलांक ४ च्या लोकांना ‘वर्कहॉलिक’ म्हटले जाते. याचे कारण म्हणजे ते प्रचंड मेहनत करतात. त्यांना आपले काम इतके प्रिय असते की ते पूर्ण करण्यासाठी ते दिवस-रात्र एक करतात. कामापुढे त्यांना इतर काहीही दिसत नाही आणि याच जिद्दीच्या जोरावर ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात.
