अंकशास्त्रानुसार (Numerology), तुमच्या जन्मतारखेची एकूण बेरीज म्हणजे तुमचा मूलांक असतो. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म १६ तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक १ + ६= ७ असा असेल. अंकशास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला अशा काही मूलांकांच्या व्यक्तींबद्दल सांगणार आहोत, ज्या स्वभावाने खूप हट्टी असतात आणि आपली चूक सहज मान्य करत नाहीत. हे कधी आपल्या वर्चस्वाच्या जोरावर स्वत:ची चूक असतानाही समोरच्या व्यक्तीला दोषी ठरवत ‘सॉरी’ म्हणायला लावतील. चला जाणून घेऊया या लोकांची अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत, जी त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवतात.

स्वतः कधी चूकत नाहीत असा समज (Fault-Proof)

अंकशास्त्रानुसार, मूलांक ७ असलेल्या लोकांना आपली चूक मान्य करणे सर्वात कठीण जाते. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ या तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ७ मानला जातो. या मूलांकाच्या लोकांवर केतू ग्रहाचा प्रभाव असतो. हे लोक आपली चूक मान्य करण्याऐवजी, अनेकदा ती कशी योग्य आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

कसा असतो स्वभाव?

मूलांक ७ च्या लोकांच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाले तर, हे लोक स्वतःच्याच सिद्धांतांवर आणि एका गूढ जगात जगतात. हे लोक स्वतःला नेहमी निर्दोष मानतात, म्हणजेच त्यांच्याकडून कधीच कोणती चूक होऊ शकत नाही, असा त्यांचा ठाम समज असतो. आपली चूक स्वीकारण्यात त्यांना प्रचंड लाजीरवाणे वाटते. आपण जे विचार करतोय किंवा जे करत आहोत, तेच योग्य आहे असे त्यांना वाटते.

या मूलांकाचाही आहे समावेश

मूलांक ८ चे लोक देखील अशा लोकांमध्ये समाविष्ट आहेत जे खूप हट्टी, गंभीर आणि अंतर्मुखी (introvert) असतात. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची जन्मतारीख ८, १७ किंवा २६ असते, त्यांचा मूलांक ८ असतो. या मूलांकाच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव असतो. हे लोकही आपली चूक मान्य करण्याऐवजी वादविवाद (arguments) करून स्वतःलाच योग्य ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात.

कसा असतो स्वभाव?

मूलांक ८ चे लोक शनि ग्रहाच्या प्रभावामुळे अत्यंत महत्त्वाकांक्षी, संघर्षशील आणि खंबीर विचारांचे असतात. हे लोक नशिबापेक्षा आपल्या कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. त्यांना सुरुवातीच्या आयुष्यात संघर्षाचा सामना करावा लागू शकतो, परंतु कठोर परिश्रमाच्या जोरावर हे लोक जीवनात यश मिळवतात. हे लोक स्वभावाने प्रचंड हट्टी असतात आणि आपली चूक लवकर मान्य करत नाहीत. चूक स्वीकारताना त्यांना संकोच किंवा लाज वाटते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)