Best Busninessman By Mulank : मूलांक ५ हा बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्क, वाणी यांचे प्रतीक मानला जातो. कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. या मूलांक असलेल्या लोकांवर बुधाचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो. बुध शक्तिशाली असून आयुष्यात भरपूर पैसा कमवण्यात मदत करते. त्यांची वाणी इतकी प्रभावी असते की, त्यांना व्यावसायिक जगात मोठे यश मिळवण्यात मदत होते. चला तर मूलांक ५ असणाऱ्या लोकांच्या पाच प्रमुख वैशिष्ठांबद्दल जाणून घेऊया जे त्यांना यशस्वी व्यावसायिक बनवतात.

१. संवाद

तुमचे सगळ्यात महत्वाचे गुण म्हणजे वाणी व संवाद; या दोन गोष्टींच्या जोरावर तुम्ही स्वतःचे नाव मोठे करता. तुमची बोलण्याची शैली इतकी प्रभावी असते की, कोणीही तुमच्याकडे लगेच आकर्षित होऊन जाते. काही मिनिटांतच तुम्ही स्वतःच्या शब्दांनी इतरांना प्रभावित करू शकता. हा गुण तुम्हाला अत्यंत कठीण व्यावसायिक फायदे देखील आपल्या बाजूने वळविण्यात मदत करतो. तुम्हाला ग्राहकांना कसे हाताळायचे याबद्दल उत्तम जाण असते.

२. जोखीम पत्करणे

जोखीम पत्करण्याची क्षमता असेल तरच एखादा व्यावसायिक यशस्वी होऊ शकतो आणि तुमच्या मूलांकाची जोखीम पटकणाऱ्याची क्षमता उत्तम असते. मूलांक ५ असणारी मंडळी जोखीम पत्करण्यास कधीही घाबरत नाहीत आणि अशा उद्योगांमधून भरपूर पैसेही कमावतात.

३. निर्णयक्षमता

योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे व्यावसायिक जगात प्रगती करू शकतात. मूलांक ५ असणारी मंडळी याबाबतीत आघाडीवर असतात. बुध ग्रहामुळे त्यांची निर्णयक्षमता खूप प्रबळ असते. ही मंडळी कोणत्याही कठीण परिस्थितीतही घाबरत नाहीत, उलट त्वरित अचूक निर्णय घेतात.

४. एकाच वेळी अनेक कामे

मूलांक ५ असलेल्या लोकांमध्ये एकाच वेळी अनेक कामे हाताळण्याची अद्भुत क्षमता असते. त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन गोष्टी करून पाहण्याची आवड असते. हा गुण त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करतो आणि तुम्हाला प्रचंड यश देखील मिळवून देतो. ही मंडळी कालांतराने कौशल्ये विकसित करत राहतात, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात खूप फायदा होतो.

५. कधीही हार न मानण्याची सवय

तुमची सर्वात मोठी ताकद ही असते की, तुम्ही कधीही हार मानत नाहीत. व्यवसायात कितीही चढ-उतार आले तरीही थांबत नाहीत. नुकसान झाले तरीही लगेचच पुन्हा उभारी घेतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)