Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो त्याचप्रमाणे अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांक अंकाचा सुद्धा एक स्वामी ग्रह असतो. आपल्या जन्मतारखेच्या अंकाची बेरीज म्हणजे मूलांक होय. उदा. ३, १२, २१ आणि ३० या जन्मतारखेचा मूलांक ३ असतो. आज आपण मूलांक ५ विषयी जाणून घेणार आहोत. मूलांक ५ चा स्वामी ग्रह हा बुध असतो. बुध ग्रह बुद्धि, संवाद, वाणी आणि व्यवसायाचा कारक असतो. मूलांक ५ असलेल्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो.

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला झाला असेल त्याचा मूलांक ५ असतो. मूलांक ५ असलेले लोक अत्यंत बुद्धिमान असतात. त्यामुळे ते जीवनात खूप यशस्वी होतात आणि यश प्राप्त करतात. आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (people are so clever and intelligent who born on these dates job or business in which sector they will get success)

Shocking video of a baby girl caught fire viral video on social media
त्याची एक चूक अन् चिमुकली आगीत अक्षरश: होरपळली; घरात लहान मुलं असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : पुढील १२० दिवस शनी करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज पैसा

मूलांक ५ असलेल्या व्यक्तीचा स्वभाव बोलका असतो. त्यांची बोलण्याची शैली ही अत्यंत रोमांचक व मजेशीर असते.त्यांच्या संवाद कौशल्याने ते इतरांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. त्यामुळे प्रत्येक लोकांबरोबर या लोकांचे चांगले जमते. याच गुणामुळे त्यांना भरपूर मोठा मित्र परिवार असतो आणि वेळोवेळी ते आपली मैत्री निभवताना दिसतात.

अस्थिर स्वभाव

मूलांक ५ असलेले लोक एका जागी फार काळ टिकत नाही. त्यांचे मन सतत बदलत असते. त्यांना फिरायला खूप आवडते. त्यांचे मन स्थिर राहात नाही. ते एका ठिकाणी बसून अनेक गोष्टींचा विचार करतात. त्यांच्या अस्थिर स्वभावामुळे अनेकदा त्यांचे नुकसान होते.

हेही वाचा : Shani Margi 2024 : शनीदेव कुंभ राशीत मार्गी! कुंभसह ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा अन् यश

करिअर

मूलांक ५ असलेल्या व्यक्तीकडे संवाद कौशल्य चांगले असते. जसे की लेखन, मार्केटिंग, अॅडवरटायझिंग इत्यादी. क्षेत्रात ते आपले नशीब आजमावू शकतात. याशिवाय ते खूप चांगले विचारवंत असतात. ते बदलत्या काळानुसार त्यांचे विचार अपडेट करत असतात. ते व्यवसायात भरपूर यशस्वी होतात आणि चांगला पैसा कमावतात.

लकी नंबर

अंकशास्त्रानुसार मूलांक ५ असलेल्या लोकांचा लकी नंबर ५ आणि ९ असतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader