Numerology : अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यव्हार, भविष्य, वैवाहिक जीवन, करिअर, आर्थिक स्थिती इत्यादी विषयी जाणून घेता येते.जन्मतारखेनुसार प्रत्येक राशीचा मूलांक अंक हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक मूलांकचा स्वामी ग्रह सुद्धा वेगळा असतो.
४२ वर्षापर्यंत करावा लागतो संघर्ष
ज्या लोकांचा जन्म ४, १३ आणि २२ आणि ३१ तारखेला होतो त्या लोकांचा मूलांक ४ असतो. या मूलांकचा स्वामी ग्रह राहु असतो. राहु सुरुवातीला कष्ट देतात आणि नंतर अपार यश देतात. ज्या लोकांवर राहुचा प्रभाव दिसून येतो, त्यांना ४२ वर्षानंतर भरपूर यश मिळते. राहु हा अचानक व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडवून आणतो म्हणजे व्यक्तीला अचानक धनलाभ आणि यश मिळते.
हेही वाचा : अजित पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळविण्यात अडचणी- ज्योतिषांची भविष्यवाणी
कसा असतो यांचा स्वभाव?
- ज्या लोकांचा मुलांक ४ असतो ते उत्तम योजना आखतात. ते नेहमी व्यावहारिक होऊन विचार करतात. ते स्वभावाने थोडे रहस्यमयी असतात. ते सहसा व्यक्त होत नाही आणि फार बोलत नाही.
- हे लोक अत्यंत हट्टी आणि त्यांच्या मनाचे मालक असतात. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला आवडतात. ते अनेकदा कोणीही दिलेला सल्ला ऐकत नाही याच कारणाने त्यांना अनेकदा चुकीच्या सवयी अंगीकारतात आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. या लोकांना बदलण्याची सवय नसते. ते जसे जगतात तसे जगणे त्यांना आवडते. त्यांना कोणत्याही नवीन वातावरणाशी जुळवून घेणे आवडत नाही.
- राहू हा मूलांक ४ च्या लोकांचा अधिपती ग्रह आहे. त्याची खासियत ही आहे की हे लोक इतरांना कधीही दुःखी पाहू शकत नाहीत. हे लोक जन्मतःच प्रामाणिक आणि मेहनती असतात. या लोकांना इतरांशी मैत्री करणे आणि लोकांमध्ये मिसळणे आवडत नाही. त्यांना एकटे राहायला आवडते. ज्यांच्याशी त्यांचे जवळचे नाते आहे, त्यांच्याशी ते प्रामाणिक नाते जपतात आणि मनापासून या नात्यात राहतात.
- अंकशास्त्रानुसार, हे लोक व्यावहारिक आणि विश्वासार्ह असतात. आयुष्यात चढ-उतार आले तरी हे लोक जिद्दीने आपले ध्येय साध्य करतात. त्यांचा स्वभाव साधा असतो. त्यांच्या कौशल्य आणि प्रामाणिकपणामुळे लोक त्यांना पसंत करतात. हे लोक तडजोड वृत्तीचे असतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)