Numerology : अंकशास्त्रामध्ये अंकाना खूप जास्त महत्त्व आहे. व्यक्तीच्या जन्मतारीख ही अत्यंत महत्त्वाची असते. या जन्मतारखेवरून त्यांचा मूलांक ठरत असतो. प्रत्येक मूलांक सुद्धा व्यक्तीचे व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती सांगतो. आज आपण मूलांक ३ असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. त्यांचा स्वभाव, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे असते, याविषयी जाणून घेऊ या. (Numerology News : Dates for Wealth and Success Late in Life)
या तारखेला जन्मतात मूलांक ३ चे लोक (Birth dates of Mulank 3)
३, १२, २१ आणि ३० तारखेला ज्या लोकांचा जन्म होतो, त्या लोकांचा मूलांक ३ असतो. मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरू असतो. या लोकांवर गुरूचा खूप जास्त प्रभाव असतो तसेच गुरुची यांच्यावर खूप जास्त कृपा असते. गुरूमुळे हे लोक धैर्यवान, मेहनती, धार्मिक आणि चांगले व्यक्तिमत्त्व असलेले असतात.
हेही वाचा : Dhanteras 2024: यंदा कधी आहे धनत्रयोदशी, २९ किंवा ३० ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि सणाचे महत्त्व
हे लोक स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी असतात (Self-respecting and ambitious)
मूलाकं ३ असलेले लोक महत्त्वाकांक्षी आणि स्वाभिमानी असतात. हे लोक प्रत्येक समस्येचा आणि आव्हानांचा सामना करतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे लोक खूप मेहनतीने काम करतात आणि यश मिळवतात. त्यांना आयुष्यात बंधने नको असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात इतरांचा हस्तक्षेप आवडत नाही.
मूलांक 3 असलेले लोक खूप आत्मनिर्भर असतात. ते त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागू देत नाही. ते सहसा लोकांकडून मदत घेणे टाळतात. हे लोक खूप दूरदर्शी असतात त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज येतो.
आयुष्यात खूप उशीरा मिळते यश (people having these birth Dates get Wealth and Success Late in Life)
मूलांक ३ असलेल्या लोकांचे सुरुवातीचे आयुष्य खूप कष्टमय असते. करिअरच्या सुरुवातीला त्यांना आर्थिक समस्या जाणवतात आणि आर्थिक स्थिती मजबूत राहते. या लोकांना धर्म आणि अध्यात्मामध्ये ऋची असते. हे लोक अभ्यासूवृत्तीचे असतात. त्यामुळे यांच्याकडे ज्ञानाचा साठा कधीही कमी नसतो.
हेही वाचा : Zodiac Signs: गुरु-पुष्य योगाने ३ राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार! लक्ष्मी येईल दारी
प्रेमसंबंध टिकत नाही पण वैवाहिक आयुष्यात सुखी असतात (Unlucky in love relation)
मूलांक ३ असलेल्या लोकांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाही. ते प्रेमसंबंधामध्ये स्थिर नसतात. मात्र त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी नांदते
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)