These Birth Dates Face Love Betrayal: सध्या प्रेमातील फसवणूक, विश्वासघात आणि नात्यांमधील दुरावा याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की, काही लोकांनाच प्रेमात वारंवार धोका का मिळतो? अंकशास्त्रानुसार यामागे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, भावनिक वृत्ती आणि मूलांक काही प्रमाणात कारणीभूत ठरू शकतो. काही मूलांकाचे लोक नातं मनापासून जपतात; पण त्याच स्वभावामुळे अनेकदा त्यांची फसवणूकही होते, असं अंकशास्त्रात मानलं जातं. अर्थात, हे संकेत अंकशास्त्रावर आधारित असून, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यासाठी ते तंतोतंत लागू होतीलच, असं नाही.
नातं मनापासून जपतात…; पण अनेकदा स्वतःच जखमी होतात
अंकशास्त्रानुसार काही लोक प्रेमात स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीला अधिक महत्त्व देतात. नात्यासाठी कोणतीही तडजोड करण्याची त्यांची तयारी असते. मात्र, याच स्वभावाचा गैरफायदा काही जण घेतात. त्यामुळे विश्वासघात, फसवणूक किंवा हृदयभंगाचा सर्वाधिक सामना याच लोकांना करावा लागतो, असं मानलं जातं.
मूलांक २ – भावना जास्त; संशय कमी
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २० किंवा २९ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक २ असतो. या मूलांकाचा स्वामी चंद्र मानला जातो.
हे लोक अतिशय भावनिक, प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात. त्यांना समोरच्या व्यक्तीवर सहज विश्वास ठेवण्याची सवय असते. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास त्यांना सर्वाधिक मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो.
मूलांक ४ – शेवटपर्यंत साथ देणारे
४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ४ असतो. या मूलांकाचा स्वामी राहू मानला जातो.
हे लोक नातं शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करतात. कठीण काळातही जोडीदाराची साथ सोडत नाहीत. मात्र, हट्टी स्वभाव आणि चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास यांमुळे ते अनेकदा दुखावले जातात. विश्वासघात झाल्यानंतर त्यांना त्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.
मूलांक ७ – प्रत्येक जण स्वतःसारखाच प्रामाणिक असेल, अशी अपेक्षा
७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ७ असतो. या मूलांकाचा स्वामी केतू आहे.
हे लोक स्वतः अत्यंत प्रामाणिक असल्यामुळे समोरची व्यक्तीही तशीच असेल, अशी अपेक्षा करतात. पण, जेव्हा विश्वास तुटतो, तेव्हा त्यांना तो धक्का पचवणं कठीण जातं. त्यामुळे नात्यातील फसवणूक त्यांना दीर्घकाळ विसरता येत नाही.
मूलांक ८ – एकदा नातं जोडल्यानंतर आयुष्यभर निभावतात
८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ८ असतो. या मूलांकाचा स्वामी शनी मानला जातो.
हे लोक कोणावरही लगेच विश्वास ठेवत नाहीत. मात्र, एकदा त्यांनी एखाद्याला आपलं मानलं की, ते शेवटपर्यंत त्याला साथ देण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा गैरसमज, संवादाचा अभाव किंवा परिस्थितीमुळे त्यांची नाती तुटतात आणि त्याचा सर्वाधिक मानसिक परिणाम त्यांच्यावर होतो.
नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं
अंकशास्त्र काही संकेत देत असलं तरी कोणतंही नातं टिकण्यासाठी विश्वास, संवाद, परस्पर आदर आणि प्रामाणिकपणा या बाबी सर्वांत जास्त महत्त्वाच्या असतात. केवळ मूलांक किंवा जन्मतारखेवर कोणाचं प्रेमी जीवन अवलंबून नसतं. त्यामुळे कोणत्याही नात्यात अंधविश्वास न ठेवता, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे.
शेवटी पाहा… तुमची जन्मतारीख या यादीत आहे का?
अंकशास्त्रानुसार प्रेमात विश्वासघात किंवा हृदयभंगाचा अनुभव येण्याची शक्यता ज्या मूलांकांमध्ये अधिक मानली जाते, त्या मूलांकाच्या जन्मतारखा खालीलप्रमाणे :
मूलांक २: २, ११, २०, २९
मूलांक ४: ४, १३, २२, ३१
मूलांक ७: ७, १६, २५
मूलांक ८: ८, १७, २६
(टीप: ही माहिती अंकशास्त्रातील मान्यतांवर आधारित आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असेच घडेल, असा होत नाही. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा वैयक्तिक निर्णय केवळ अशा माहितीच्या आधारावर घेऊ नये.)
