Numerology : अंक ज्योतिषमध्ये मूलांकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मूलांकचा संबंध हा देवाशी आणि ग्रहाशी असतो. तुमचा मूलाकं कोणता आहे? हे आजच जाणून घ्या. कारण त्यावरून तुमचा स्वभाव आणि भविष्य ठरत असते. तुम्हाला माहिती आहे का देवी लक्ष्मीचा संबंध कोणत्या मूलांकबरोबर आहेत? ज्या मूलांकबरोबर देवी लक्ष्मीचा संबंध आहे, त्या मूलांकच्या लोकांजवळ भरपूर धनसंपत्ती व पैसा असतो. त्यांना पैशांची कमतरता कधीही भासत नाही. आज आपण त्याच मूलांक विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख पाहून त्या व्यक्तीचा मूलांक ठरवला जातो. आज आपण अशा मूलांकविषयी जाणून घेणार आहोत ज्याचा संबंध माता लक्ष्मीबरोबर येतो. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला होतो त्यांचा मूलांक ६ असतो. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ६ असतो. त्यांचा संबंध धन वैभवाचा कारक शुक्र ग्रहाशी असतो आणि या लोकांवर शुक्र ग्रहाची कृपा दिसून येते. अशा लोकांना पैशांची कमतरता कधीही भासत नाही. माता लक्ष्मीचा आशीर्वाद यांच्यावर नेहमी असतो.

हेही वाचा : १४ जून पंचांग: दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींच्या नशिबात घडतील मोठे बदल; लक्ष्मी कोणत्या राशीत देईल तुम्हाला आशीर्वाद?

ज्या लोकांचा मूलांक ६ असतो ते लोक खूप भाग्यवान असतात. या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा नेहमी असते. या लोकांना आयुष्यात धन संपत्ती भरभरून मिळते. अशा लोकांना आर्थिक समस्या कधीही जाणवत नाही. माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे यांची आर्थिक वृद्धी सतत होत असते हे लोक नेहमी सुखी, समाधानी आणि आनंदी असतात.

हेही वाचा : Chanakya Niti : तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचेय? मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा स्वभाव

या लोकांचा स्वभाव खूप साधा असतो. त्यांना इतरांची काळजी घ्यायला खूप आवडते. प्रत्येकाबरोबर आपुलकीने वागणे आणि त्यांची काळजी घेणे या लोकांच्या स्वभावात असते. मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर हे लोक त्यांचे सर्व कामे पूर्ण करतात.
असे लोक आव्हानांना सामोरे जातात. ते प्रत्येक समस्यांचा हिंमतीने सामना करतात. ते खूप मेहनती असतात. मेहनतीच्या जोरावर ते यश मिळतात. त्यामुळे मूलांक ६ हा माता लक्ष्मीचा प्रिय मूलांक आकडा मानला जातो. या लोकांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम दिसून येतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)