Couple Perfect For Each other: ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या प्रकारे कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व आणि आयुष्याबद्दल अंदाज वर्तवला जातो, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्माच्या तारखेवरून त्या व्यक्तीचे भविष्य, गुणांचे वर्णन केले जाते. अंकशास्त्रामध्ये मूलांक आणि भाग्यांक यांच्यावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुण, भविष्याबद्दल भाष्य केले जाते. दरम्यान, आज आपण अशा काही मूलांकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे परफेक्ट पार्टनर ठरतात.
‘या’ दोन मूलांकाचे लोक एकमेकांसाठी परफेक्ट असतात
मुलांक २
कोणत्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. मूलांक २ वर चंद्र ग्रहाचे वर्चस्व असते, त्यामुळे या मूलांकाचे लोक अतिशय संवेदनशील, शांत, भावनिक असतात. या मूलांकासाठी २, ४, ६ व ९ मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर ठरतात. त्यापैकी एका मूलांकाच्या जोडीदाराशी लग्न केल्यास या लोकांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहते.
मुलांक ९
कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. मूलांक ९ वर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या मूलांकाचे लोक अतिशय उत्साही, रागीट व परिश्रमी असतात. या मूलांकासाठी १, २, ३, ४, ६, ७ व ९ या मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर असतात. यापैकी एका मूलांकाच्या जोडीदाराशी लग्न केल्यास या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.
दरम्यान, मूलांक २ आणि मूलांक ९ चे लोक एकमेकांसाठी अतिशय परफेक्ट असतात. या लोकांचे एकत्र येणं नियतीने लिहिलेले असते. मूलांक २ हा चंद्राचा तर मुलांकाचा ९ हा मंगळ ग्रहाचा आहे, एक ग्रह शांत तर दुसरा ग्रह ऊर्जावान असतो, त्यामुळे या मुलांकाचे लोक एकमेकांना परिपूर्ण करतात, एकमेकांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्यास समर्थ असतात.
मूलांक २ असलेल्या लोकांच्या स्वभावात संवेदनशीलता, भावूकता असते, तसेच हे लोक कोणावर ना कोणावर अवलंबून असतात. कधी पार्टनरवर तर कधी इतर कोणावर. हे लोक खूप काळजी घेणारे स्वभावाचे असतात. आपल्या व्यक्तिमत्त्वामुळे ते सगळ्यांना आकर्षित करतात. हे खूप सर्जनशील असतात. तसेच ते जास्त विचार करतात. यामुळे ते एकाच कामावर जास्त वेळ टिकू शकत नाहीत आणि जास्त वेळ विचार करण्यातही अडकतात. त्यांच्या अशा स्वभावाला एका धीट, आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाची गरज असते. ती गरज मूलांक ९ असलेले लोक पूर्ण करतात.
मूलांक ९ असलेल्या या अंकाचा स्वामी ग्रह मंगळ आहे, ज्याला ज्योतिषशास्त्रानुसार धैर्य आणि ऊर्जेचा घटक मानले जाते. ही मंडळी अत्यंत हट्टी असतात. जर कोणी त्यांना आव्हान करण्याचा प्रयत्न केला, तर ते त्याला पराभूत करेपर्यंत स्वस्थ बसत नाहीत. मंगळाच्या प्रभावामुळे हे आयुष्यातील प्रत्येक संकटांचा धैर्याने सामना करता. अशक्य गोष्ट शक्य करण्याची त्यांच्यात अढळ इच्छाशक्ती असते. या लोकांच्या रागीट स्वभावाला मूलांक २ असलेले लोक शांत करू शकतात. म्हणून हे दोन्ही मूलांक एकमेकांसाठी अनुरूप आहेत.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
