Numerology Predictions: न्यूमरोलॉजीमध्ये जन्मतारखेवरून रेडिक्स नंबर काढला जातो. प्रत्येक नंबरचा स्वभाव आणि जीवनशैली वेगळी असते. काही नंबरचे लोक आलिशान आणि उच्च दर्जाची लाइफ पसंत करतात, तर काहींना साधेपणा आणि शांतता अधिक महत्त्वाची वाटते. हे पूर्णपणे खरे असेलच असे नाही, पण स्वतःला समजून घेण्याचा हा एक मार्ग मानला जातो.

आजकाल प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते की त्याचे नशीब कसे आहे, भविष्यात किती पैसा, नाव आणि सुख मिळेल आणि तो आलिशान जीवन जगू शकेल का. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा दावा न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र करते. ही एक जुनी मान्यता आहे ज्यात तुमच्या जन्मतारखेवरून एक खास नंबर काढला जातो, ज्याला रेडिक्स नंबर म्हणतात. असे मानले जाते की हा नंबर तुमचा स्वभाव, विचार, यश आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकतो. काही लोक याला फक्त श्रद्धा मानतात, तर अनेक लोक याच्या आधारावर निर्णयही घेतात.

न्यूमरोलॉजीनुसार काही विशिष्ट तारखांना जन्मलेले लोक लहानपणापासूनच सुखसोयी आणि आलिशान जीवनाकडे आकर्षित होतात. अनेकदा त्यांना कमी संघर्षातही चांगले जीवन मिळते. तुमची जन्मतारीख तुम्हाला कशा प्रकारच्या जीवनाकडे घेऊन जाऊ शकते, हे जाणून घ्यायचे असेल तर ही माहिती उपयोगी ठरेल.

रेडिक्स नंबर काय आणि कसा काढायचा?

रेडिक्स नंबर काढणे सोपे आहे. जन्मतारखेतील अंकांची बेरीज करायची. उदाहरणार्थ, जन्मतारीख ३० असेल तर ३+० = ३. हा तुमचा रेडिक्स नंबर.

नंबर १ (१, १०, १९, २८)

या लोकांवर सूर्याचा प्रभाव असतो. हे नैसर्गिक लीडर असतात. त्यांना नाव, प्रतिष्ठा आणि उच्च दर्जाचे जीवन आवडते. ब्रँडेड वस्तूंना लवकर आकर्षित होतात.

नंबर २ (२, ११,२०, २९)

या लोकांवर चंद्राचा प्रभाव असतो. हे भावूक असतात आणि सुंदर गोष्टी आवडतात. शांत वातावरण आणि सर्जनशील जीवन पसंत करतात. साधेपणातही लक्झरी जगायला आवडते.

नंबर ३ (३, १२, २१, ३०)

या लोकांवर गुरुचा प्रभाव असतो. मोठी स्वप्ने पाहतात. मोठे घर, मोठी गाडी आणि समाजात मान-सन्मान मिळवायची इच्छा असते.

नंबर ४ (४, १३, २२, ३१)

या लोकांवर राहूचा प्रभाव मानला जातो. हे प्रॅक्टिकल असतात. विनाकारण खर्च करत नाहीत, पण खर्च करताना दर्जावर लक्ष देतात.

नंबर ५ (५, १४, २३)

या लोकांवर बुधाचा प्रभाव असतो. हे स्मार्ट आणि अॅक्टिव्ह असतात. नवीन गोष्टी शिकणे, प्रवास करणे आणि गॅझेट्स वापरणे आवडते.

नंबर ६ (६, 15, 24)

या लोकांवर शुक्राचा प्रभाव असतो. हे खरे लक्झरी प्रेमी असतात. महागड्या वस्तू, सुंदर घर आणि स्टायलिश जीवन आवडते.

नंबर ७ (७, १६, २५)

या लोकांवर केतूचा प्रभाव असतो. भौतिक सुखांपेक्षा मानसिक शांततेला महत्त्व देतात. साधे आणि शांत जीवन पसंत करतात.

नंबर ८ (८, १७, २६)

या लोकांवर शनीचा प्रभाव असतो. मेहनती असतात. स्वतःच्या कष्टाने पैसा आणि यश मिळवतात. लक्झरी जीवन हळूहळू येते.

नंबर ९ (९, १८, २७)

या लोकांवर मंगळाचा प्रभाव असतो. धाडसी असतात आणि इतरांना मदत करायला पुढे असतात. लक्झरी जीवन जगतात पण ते इतरांसोबत वाटून घेतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)