Simple Mulank People: ३ मूलांक असे आहेत, ज्यांचे लोक स्वभावाने खूपच सरळ असतात. या लोकांच्या सरळ स्वभावाचा अनेकदा हुशार आणि स्वार्थी लोक फायदा घेतात. साधेपणामुळे या लोकांना अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो.

स्वभावाने सरळ असतात हे लोक

अंकशास्त्रानुसार, मूलांक २, ६ आणि ९ असलेले लोक स्वभावाने सरळ असतात. या लोकांवर त्यांच्या स्वामी ग्रहांचा प्रभाव असल्यामुळे ते भावनिक, दयाळू आणि इतरांना मदत करणारे असतात. अनेकदा हुशार लोक त्यांच्या या स्वभावाचा चुकीचा फायदा घेतात. काही लोक या मूलांकाच्या लोकांविरुद्ध कट रचून त्यांना अडचणीतही आणू शकतात.

मूलांक २ असलेले लोक

महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो. या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्राच्या प्रभावामुळे हे लोक भावनिक आणि शांत स्वभावाचे असतात. हे लोक मनाने खूपच सरळ असतात. त्यांच्या या सरळ स्वभावाचा अनेकदा हुशार लोक फायदा घेतात.

मूलांक ६ असलेले लोक

अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ असलेल्या लोकांची जन्मतारीख ६, १५ आणि २४ असते. या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक चांगले आणि सुखी जीवन जगतात. हे लोक मनमिळाऊ स्वभावाचे असतात. इतरांच्या आनंदातच स्वतःचा आनंद शोधतात. मात्र, अनेकदा काही लोक त्यांचा चुकीचा फायदा घेतात. काही लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्यासोबत राहतात.

मूलांक ९ असलेले लोक

महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळाच्या प्रभावामुळे हे लोक धाडसी आणि उत्साही असतात. हे लोक दयाळू स्वभावाचे असतात. समोरच्याला मदत करण्यासाठी ते अनेकदा जास्त विचार न करता लगेच तयार होतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांचे नुकसान होते.

या लोकांसाठी सल्ला

अंकशास्त्रानुसार, या मूलांकाच्या लोकांनी कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नये. कोणाला मदत करण्यापूर्वी मनासोबतच डोक्यानेही विचार करावा. नाहीतर काही लोक तुमच्या सरळ स्वभावाचा चुकीचा फायदा घेऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)