Numerology Prediction Rich Mulank: तुम्ही लक्ष दिलं असेल की मूलांक ६ असलेले लोक नेहमी लक्झरी आणि पैसा-संपत्तीच्या आसपास दिसतात. आज आपण अंकशास्त्राच्या मदतीने जाणून घेणार आहोत की रणवीर सिंह, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित यांसारखे मूलांक ६ असलेले लोक इतके श्रीमंत का आणि कसे असतात?
अंकशास्त्र
अंकशास्त्रानुसार, आयुष्यात येणारा प्रत्येक अंक तुमच्या जीवनावर आणि भविष्यात परिणाम करतो. याच्या मदतीने तुम्ही स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल अनेक गोष्टी जाणून घेऊ शकता.
आलिया-रणवीर इतके श्रीमंत का?
आलिया, रणवीर आणि माधुरी या सर्वांचा मूलांक ६ आहे. हे सगळे लोक खूप श्रीमंत आहेत आणि आपल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत. पण यामागचं कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
आलिया भट्टचा मूलांक
आलिया भट्टचा जन्म १५ मार्चला झाला आहे. त्यामुळे जन्मतारखेच्या बेरीनुसार तिचा मूलांक ६ होतो. मूलांक ६ वर शुक्र ग्रहाची विशेष कृपा असते, त्यामुळे तिच्याकडे नेहमी लक्झरी आणि सुखसुविधा असतात.
रणवीर सिंहचा मूलांक
रणवीर सिंह त्याच्या अभिनयासाठी आणि महागड्या डिझायनर कपड्यांसाठी ओळखला जातो. त्याचा जन्म ६ जुलैला झाला आहे. रणवीरच्या व्यक्तिमत्त्वात शुक्र ग्रहाचा प्रभाव स्पष्ट दिसतो.
माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षितचा जन्म १५ मे रोजी झाला आहे. तिचा मूलांकही ६ आहे. मूलांक ६ असलेले लोक श्रीमंत असण्याबरोबरच सुंदरही असतात. माधुरीकडे सौंदर्य आणि पैसा दोन्ही भरपूर आहेत. हे सगळं शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे आहे.
शुक्र ग्रहाचा प्रभाव
मूलांक ६ चा स्वामी शुक्र (Venus) आहे. ज्योतिषात शुक्र हा धन, वैभव, लक्झरी आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. याच ग्रहाच्या कृपेने या लोकांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि पैशाची कमतरता नसते.
कला आणि सर्जनशीलता
मूलांक ६ असलेले लोक नैसर्गिकरित्या सर्जनशील असतात. अभिनय, संगीत, फॅशन आणि मीडिया यांसारख्या क्षेत्रात ते लवकर नाव आणि प्रसिद्धी मिळवतात. आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित यांचं यश याचं उत्तम उदाहरण आहे.
लक्झरीची आवड
या लोकांना महागड्या आणि ब्रँडेड वस्तूंची खूप आवड असते. शुक्राची ऊर्जा त्यांना एक आलिशान जीवनशैलीकडे घेऊन जाते आणि ती मिळवण्यासाठी लागणारी मेहनत आणि संधीही त्यांना मिळतात. त्यामुळे मूलांक ६ असलेल्या लोकांकडे भरपूर पैसा आणि प्रसिद्धी असते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
