Numerology Prediction: अंकशास्त्रानुसार एक असा खास मूलांक आहे, ज्याच्याशी संबंधित मुलं खूप नशीबवान मानली जातात. त्यांना अनेक गोष्टी सहज मिळतात. ही मुलं खूप हुशार असतात आणि त्यांच्यात नेतृत्व करण्याची उत्तम क्षमता असते.

आपल्या कष्ट आणि गुणवत्तेच्या जोरावर ही मुलं कमी वयातच मोठं यश मिळवतात. यांच्यावर सूर्यदेवाची विशेष कृपा असते. आता तुम्हाला समजलं असेलच की आपण कोणत्या मूलांकाच्या मुलांबद्दल बोलत आहोत.

तर येथे आपण मूलांक १ असलेल्या मुलांबद्दल बोलत आहोत. कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. या मूलांकाचा स्वामी सूर्य ग्रह मानला जातो. सूर्याच्या प्रभावामुळे या मूलांकाच्या मुलांमध्ये एक वेगळाच आकर्षण आणि आत्मविश्वास दिसून येतो. लहानपणापासूनच त्यांच्यात राजांसारखे गुण आणि जबरदस्त व्यक्तिमत्त्व असतं.

मूलांक १ चे मुलं खूप भाग्यवान असतात

मूलांक १ चे मुलं नशीबवान मानले जातात. म्हणतात की यांना मेहनतीचं फळ खूप लवकर मिळतं. हे ज्या कामाला हात लावतात त्यात यश मिळवतात. यांच्यात आत्मविश्वासाची कधीच कमतरता नसते. हे जे ठरवतात ते पूर्ण करूनच थांबतात. ही मुलं धोका पत्करण्यास अजिबात घाबरत नाहीत.

आपल्या ध्येयावर यांचं पूर्ण लक्ष असतं, त्यामुळे २२ ते २५ वर्षांच्या वयातच ही मुलं करिअरमध्ये चांगलं स्थान मिळवतात. यांच्यावर कुबेर देवाची विशेष कृपा असते, त्यामुळे पैशांची कमतरता फारशी भासत नाही. समाजात यांना खूप मान-सन्मान मिळतो. कमी वयातच ही मुलं चांगली संपत्ती मिळवतात. आयुष्यात ही मुलं कधीही हार मानत नाहीत आणि हाच त्यांचा गुण त्यांना मोठं यश मिळवून देतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)