Mulank 2 Personality: अंकशास्त्रात १ ते ९ या अंकांचा उल्लेख आढळतो. तसेच या अंकांवर ९ ग्रहांचे अधिपत्य मानले जाते. त्यामुळे या अंकांशी संबंधित लोकांचे व्यक्तिमत्त्व, करिअर आणि व्यवसाय एकमेकांपेक्षा वेगळे असतात. येथे आपण अंक २ बद्दल बोलणार आहोत.
जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक २ असेल. अंक २ चा स्वामी चंद्रदेव आहे. हे लोक स्वभावाने अतिशय शांत, सहनशील आणि कल्पनाशील असतात. चला जाणून घेऊया मूलांक २ असणाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व, करिअर आणि व्यवसाय याबद्दल सविस्तर…
असतात खूप भावनिक
अंकशास्त्रानुसार मूलांक २ असलेले लोक भावनिक आणि मनाने विचार करणारे असतात. तसेच हे लोक इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि नाती जपण्यात कुशल असतात. यांचा स्वभाव शांत असतो. मात्र, अनेकदा हे गरजेपेक्षा जास्त संवेदनशील होतात आणि छोट्या-छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात. तसेच यांच्यात भरपूर क्रिएटिव्हिटी असते, त्यामुळे हे कला, लेखन, संगीत आणि डिझायनिंगसारख्या क्षेत्रात चांगले यश मिळवतात.
तसेच हे लोक खाण्यापिण्याचे शौकीन असतात. शिवाय हे खूप रचनात्मक असतात आणि इतरांच्या भावना ओळखण्यात पटाईत असतात. यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन खूप क्रिएटिव्ह असतो. मात्र, मूलांक २ असलेले लोक कधी-कधी आत्मविश्वासाच्या कमतरतेचा आणि जास्त विचार करण्याच्या सवयीचा बळी ठरतात. हे इतरांवर पटकन विश्वास ठेवतात, त्यामुळे कधी-कधी त्यांना नुकसानही सहन करावे लागू शकते.
या क्षेत्रांत मिळू शकते यश
मूलांक २ असलेले लोक चांगले लेखक, कलाकार, समुपदेशक, शिक्षक, मानसशास्त्रज्ञ किंवा मीडियाशी संबंधित व्यवसायात नाव कमावू शकतात. तसेच यांची संवादकौशल्येही चांगली असतात, त्यामुळे हे पब्लिक रिलेशन आणि ह्युमन रिसोर्ससारख्या क्षेत्रांतही यशस्वी होऊ शकतात. तसेच कन्सल्टन्सी, क्रिएटिव्ह एजन्सी, इव्हेंट मॅनेजमेंट, इंटीरियर डिझायनिंग आणि ब्युटी-फॅशनशी संबंधित व्यवसायात यांना खास यश मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
