Numerology Prediction: अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून मूलांक आणि मूलांकावरून त्या व्यक्तीचा स्वामी ग्रह कोणता आहे, हे जाणून घेता येते. याच आधारावर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि जीवनाबद्दल माहिती मिळू शकते. अंकशास्त्रानुसार, काही मूलांक असलेल्या लोकांना एकटं राहायला जास्त आवडतं. हे लोक गर्दीपासून दूर राहणं पसंत करतात. त्यांना एकांत आवडतो. चला, अंकशास्त्रानुसार या सर्व मूलांक असलेल्या लोकांबद्दल जाणून घेऊया.
एकटं राहायला आवडतं या मूलांकाच्या लोकांना
मूलांक ४, ७ आणि ८ असलेले लोक समाजातील गर्दीपासून दूर, शांत आणि एकांतात राहणं पसंत करतात. या लोकांना शांतता आवडते. जन्मतारीख आणि स्वामी ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचा स्वभाव काहीसा अंतर्मुख असतो. हे लोक एकटं राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात. कठोर मेहनत करून ते आयुष्यात यश मिळवतात. या सर्व मूलांक, त्यांचे स्वामी ग्रह आणि त्यांच्या प्रभावाबद्दल तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.
मूलांक ४ असलेले लोक
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो. या लोकांचा स्वामी ग्रह राहू आहे. राहूच्या प्रभावामुळे हे लोक शिस्तप्रिय आणि व्यवहारिक मानले जातात. हे लोक आपल्या निर्णयावर ठाम असतात. ते विनाकारण आपला वेळ वाया घालवत नाहीत. त्यांना नियोजन करून काम करायला आवडतं. हे लोक इतरांपासून दूर आणि एकटं राहणं पसंत करतात.
मूलांक ७ असलेले लोक
कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो. या लोकांचा स्वामी ग्रह केतू आहे. केतूला खोल विचार करणारा आणि आध्यात्मिक ग्रह मानलं जातं. या लोकांना गर्दीत राहणं आणि गोंगाट अजिबात आवडत नाही. त्यांना एकटं राहायला आवडतं. हे लोक अनेकदा एकांतात राहून आपलं काम करतात.
मूलांक ८ असलेले लोक
मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनी आहे. महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. शनीच्या प्रभावामुळे हे लोक शिस्तप्रिय आणि मेहनती असतात. त्यांना गर्दी अजिबात आवडत नाही. हे लोक आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून काम करतात. मूलांक ८ असलेल्या लोकांना एकटं राहायला आवडतं. हे लोक सोशल लाइफपासूनही काहीसे दूर राहतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
